भारत स्पोर्ट्स अकॅडमी आरमोरी ची विद्यार्थीनी कुमारी नंदिनी ढवगाये हीची विभागीय स्तरावर निवड

Sun 19-Jan-2025,06:15 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेअंतर्गत दिनांक १६/१/२०२५ ला गडचिरोली येथील सैनिक विद्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेत भारत स्पोर्ट्स अकॅडमी ,आरमोरी ची विद्यार्थिनी कुमारी. नंदिनी ढवगाये हिने २०० मीटर रनिंग व लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला त्याबद्दल तिचे ट्रॉफी, मेडल्स, प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली चे प्रा.वैभव बोनगिरवार सर ,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी चे प्रा.प्रभात होकम सर , प्रा.सुरेंद्र वैरागडे सर उपस्थीत होते कुमारी. नंदिनी ही भारत स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक महेंद्र मने सर यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे कुमारी.नंदिनी चे मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे नंदिनी ने आपल्या विजयाचे श्रेय पालक व भारत स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक महिंद्र मने सर यांना दिले.