केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात नूतन कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न.

Wed 01-Jan-2025,07:54 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथील केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयात नूतन इमारतीमध्ये नूतन कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.पी एन बहिरे,सचिव तुळजाई ग्रामीण विकास संस्था तथा अध्यक्ष केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालय वसमत उद्घाटक म्हणून प्राचार्य आनंदराव कदम सेवानिवृत्त प्राचार्य मुख्याध्यापक शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सोनखेड ,माणिक नगर नांदेड, संभाजीनगर यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती. भीमराव कांगणे सेवानिवृत्त अभियंता वसमत पाटबंधारे विभाग प्रशांत डिग्रसकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) जि .प. हिंगोली,प्रा.शिवराज तेलंगे सर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविध्यालय हदगाव, प.स.वसमतचे गटशिक्षणाधिकारी सतिश कास्टे.वाघमारे केंद्रप्रमुख,अनिल कमळु सर केंद्रप्रमुख सर्व मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर शिक्षकांना मार्गदर्शन करताना आजच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक व कौशल्याभिमुक शिक्षणाची गरज आहे तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कला गुण कसे ओळखावे या संदर्भात मार्गदर्शन केलेअध्यक्ष समारोपीय भाषणात प्राध्यापक पी.एन बहिरे सरांनी शिक्षक व विद्यार्थ्यांनचा मोबाईलचा अतिरिक्त वापर होत असून विद्यार्थ्यांनी पुस्तकाकडे ग्रंथालय कडे वळावे अशा प्रकारचे आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी प्राचार्य पि के जगताप उपप्राचार्य वानखेडे बी एम समन्वयक राजेगोरे आर एस पर्यवेक्षक कोरडे टि.एन सर,चव्हाण सर, कवि प्रा आत्माराम राचेगोरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद याप्रसंगी उपस्थित होते.याप्रसंगी महाविद्यालयात आनंदराव कदम यांच्या हस्ते प्राध्यापिका कांचन कोल्हे मॅडम तर भीमराव कांगणे सरांच्या हस्ते प्रा विकास ददगाळे सरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.बी.राजेगोरे सरानी आभारप्रदर्शन प्रा मोहिते सरानी मानले.