प्राचार्य डॉ. इशरतउल्लाह खांन यांचे सेवानिवृत्ती निमित्य सत्कार
अरबाज पठाण (वर्धा )
मौलाना आजाद ऊर्दु जुनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. इशरतउल्लाह खांन नियत वयोमान 58 वर्ष पुर्ण तसेच तब्बल 30 वर्ष सेवा झाल्यामुळे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना निरोप देण्याकरिता कॉलेजच्या सभागृहात मुस्लीम एजूकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी अख्तर इसाजी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. समारंभाला मुस्लीम एजूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोहम्मद अली, सचिव हाजी हुसेन अली, कोषाध्यक्ष हामीद अली रिजवी, कार्यकारीणी सदस्य इमरान राही, रोशन अली, शब्बीर अली, नूर अली, शहीद अली, अब्दुल रशीद, शकील भाई कॉलेजच्या नवीन प्राचार्य परविन बानो ज़हीर खांन मोहम्मद हनीफ, अब्दुल सत्तार शेख आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते डॉ. इशरत खांन यांना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मोहम्मद अली, हुसेन अली, इमरान राही आदीनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मुमताज़ खांन तर आभार प्रा. सैफा नाज यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. इरफान बेग, प्रा. मोहम्मद अजहर, मोहम्मद आरीफ, इशरत अंजुम, शाजिया तब्बसूम, शमीम सुलताना, इकबाल शेख, शबाना परविन, एहसान राही, जावेद खांन, इकबाल शेख, शबाना परविन, इरशाद खांन यांनी अथक परिश्रम घेतले.