विज्ञानवादी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी दि २४ फेब्रुवारी २०२५: येथील राजर्षी शाहू महाराज अभिनव कला अकॅडमीचे वतीने विज्ञानवादी, समाजसुधारक, स्वच्छतादूत गाडगेबाबा यांची जयंती आरमोरी येथील दौलतराव कुथे यांच्या निवासस्थानी पार पडली.याप्रसंगी सर्वप्रथमता रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला यांच्या अकॅडमीचे अध्यक्ष दौलतराव कुथे व सचिव विलास गोंदोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करुन गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपालाचा गजर करण्यात आला.याचा निनाद परिसरातील वातावरणात गुंजला.यावेळी अकॅडमीचे उपाध्यक्ष उमेष हर्षे, कोषाध्यक्ष शालीक पत्रे, सहसचिव बळीराम दर्वे, जेष्ठ गायक तथा संगीत व कला क्षेत्रातील अकॅडमी चे संचालक किशोर हाडगे,संजय बिडवाईकर, रणजित बनकर,डॉ.रेखलाल कटरे,कामिनी पेंदाम,शांतीप्रिया येरमे, माजी वनपाल सुभाष भोयर,अनिता कुथे , लिलाधर मेश्राम,इंजि.केतन बल्लारपुरे,छबील ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांतील अकॅडमी चे अध्यक्ष दौलतराव कुथे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे किर्तनकार, समाजसुधारक गाडगेबाबा यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करत सामाजिक न्याय, सुधारणा व स्वच्छता या विषयावर केलेल्या कार्याची महती विशद केली.उमेष हर्षे, लिलाधर मेश्राम यांनीही गाडगेबाबा यांच्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल माहिती दिली.तसेच विलास गोंदोळे यांनी प्रबोधनकार संत गाडगेबाबा आपल्या किर्तनात सहजसोप्या ग्रामीण भाषेचा (व-हाडी बोलीचा)वापर करीत अंधश्रद्धा, अज्ञान यावर प्रहार करीत.तसेच त्यांनी हयातभर जनकल्याणासाठी धर्मशाळा,अनाथालये,आश्रम,धर्मार्थ दवाखाना अशा विविध समाजोपयोगी कामांची निर्मिती केली.असा उल्लेख केला.कार्यक्रमाचे संचालन अकॅडमी चे बळीराम दर्वे यांनी केले.तर आभार किशोर हाडगे यांनी मानले.यशस्वीतेसाठी राजर्षी शाहू महाराज अभिनव कला अकॅडमी च्या सर्व संचालकांनी सहकार्य केले.