नव्वद दिवस पूर्ण झालेल्या कामगार मजुरांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या खासदार,आमदार सह पत्रकार संघटने ने केले केंद्रीय मंत्री यांच्या कडे मागणी

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा:महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नरेगा व घरकुल योजना शौचालय योजनेत तसेच पांदन रस्ता बोडि खोलीकरण भात खाचर तलाव व इतर बांधकाम कामगार इमारत मार्फत ग्रामीण भागात 90 दिवस पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना व त्यांच्या परिवारांना व शिक्षणाकरिता मुला मुलींना स्कॉलरशिप शिक्षण साहित्य कीट पेटी यांच्यासह इतर सोयी सुविधा व जीवनाशक वस्तूचे सुद्धा कामगार कल्याण महामंडळाकडून सोयी सुविधा मिळावे म्हणून शासनाचे धोरण आहे परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी हे संघटनेच्या माध्यमाने आम्ही 90 दिवसाच्या कागदावर व प्रमाणपत्रावर सह्या करत नाही असा विरोध ग्रामपंचायत सचिवांनी बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळे सालेकसा तालुक्यातच नव्हे तर गोंदिया जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रातील इमारत बांधकाम कामगार आजही अनेक सोयी सुविधा पासून वंचित राहण्याची व उपासमारीची पाळी आलेली आहे सालेकशात तालुकासह गोंदिया जिल्हा हा शेतीच्या भरोशावर व मजुरीच्या भरोशावर आपल्या परिवाराचे कसेबसे तरी उदरनिर्वाह करीत असते त्यामध्ये रोजगाराचे मोठे साधन उपलब्ध नसल्यामुळे ते रोजगार हमीच्या कामावरच निर्भय असून त्यांना कसलाही आधार नाही बरेच कामगार हे नव्वद दिवसापेक्षा जास्तही काम करून सुद्धा त्यांना शासनाकडून पाहिजे त्या सोयी उपलब्ध मिळत नाही त्यामुळे कुठेतरी त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम शासनच करीत असल्याचे सध्या चित्र जिल्ह्यासह राज्यात व ग्रामीण भागात दिसत आहे त्यामुळे काम करून सुद्धा सोयी सुद्धा मिळत नाही एकीकडे रोजगार सुद्धा त्यांच्याकडून हिरावला जात आहे तुटपुंज्या मजुरीवर मजुरीचे दर कमी असल्याने त्यांना परवडत नाही शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार अतोनात वाढवण्यात आले आहे मात्र का बर कष्ट व शेतीमध्ये देशाच् पोशिंदा म्हणून सतत बळीराजाला कमी पैशांमध्ये शेतामध्ये दिवसभर काम करावा लागत असते शासकीय कर्मचाऱ्यांना आठवावेतन लागू असून केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा त्याला मंजुरी मिळाली आहे मात्र शेतकऱ्यांच्या वाली कोण असा संतप्त सवालही इमारत कामगार यांच्या कडून उपस्थित होत आहे. यासंदर्भात सालेकसा तालुका पत्रकार संघटनेचे शिष्टमंडळ यांनी केंद्रीय आदिवासी मंत्री दुर्गादास उईके,महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसान,आमदार संजय पुराम यांना प्रत्यक्षात भेटून नव्वद दिवस पूर्ण झालेल्या इमारत कामगारांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावा या मागणीची निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. सदर निवेदन देतानी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिनेश मानकर,कोषाध्यक्ष रविकुमार सोनवाने,तालुका पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंतराव शेंडे,सचिव गुलशनकुमार बनोठे सदस्यामध्ये प्रकाश टेंभरे, गुणाराम मेहर, संजय बारसे, एस.डी पुरी यांच्यासह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे.यामध्ये पत्रकार मंडळींनी हा आमच् वैयक्तिक विषय नसून जनसामान्य हिताचे प्रश्न नेहमीच पत्रकार मंडळी शासन प्रशासनाच्या नजरेस आणून देते त्यावर आमदार म्हणाले की ही गोष्ट सत्य आहे पत्रकार हा देशाच् चौथा आधारस्तंभ असून मी इमारत बांधकाम कामगारांना नक्की सोयी सुविधा उपलब्ध करून राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून समस्या मार्गी लागतील असे आश्वासन देवरी विधानसभाचे आमदार यांनी केले आहे.