डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती गठित करण्यात आली

Tue 25-Feb-2025,08:38 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव 

आमगांव तालुकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह राजयोग काॅलोनी आमगाव येथे १४एप्रिल२०२५ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी आयु.विश्वजित गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली नविन कार्यकारिणी गठित करण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये आमगाव नगरातील विविध वार्डातून बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते, त्यामध्ये एकमताने डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली,आयु. पिंकेश शेंडे अध्यक्ष,आयु.विलास मेश्राम उपाध्यक्ष,आयु.ज्योत्सना शहारे उपाध्यक्ष,आयु. प्रशांत रावते महासचिव,आयु.संजय डोंगरे सहसचिव,आयु.मेघा टेंभुर्णीकर सहसचिव,आयु.महेंद्र मेश्राम सहसचिव,आयु.ज्ञानेश्वर साखरे कोषाध्यक्ष या प्रमाणे 14 एप्रिल 2025 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समिती सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत एकमताने गठीत करण्यात आली.