भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे अतुल वांदिले यांच्या हस्ते उद्घाटन

Fri 14-Feb-2025,04:34 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श (हिंगणघाट )

 

श्री. गुरुदेव सेवा मंडळ हिंगणघाट द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार त्यांच्या काळापासून ते आतापर्यंत प्रेरणा देत आहे. दरवर्षी नवीन लोक त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन सामाजिक कार्यात सहभागी होतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार सर्व धर्म समभाव विचार आहेत. ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांचे कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तरुण पिढी आत्मसात करीत आहे. असे मनोगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त करीत खंजेरी भजन स्पर्धेच्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष धनराज डंभारे, उपाध्यक्ष दादाराव कुबडे, सचिव मूलचंदजी खंदार, गजानन फाले, डॉ. संजय हिवरकर, नारायणराव खाडे, राजू चौधरी, श्याम कोरडे, दीपक वांढरे, दिनेश नेवारे, सुनिता हिवज यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.