अग्रवाल विज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Sun 02-Mar-2025,10:56 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारा संचलित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा अविनाश डोनगापुरे यांना करिअर कट्टा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे वतीने उत्कृष्ट तालुका समन्वयक पुरस्कार प्राप्त झाला. महाविद्यालयातील करियर कट्टा समन्वयक प्रा. अविनाश डोनगापुरे व प्रा.गौरी आडे यांनी शासनातर्फे राबविण्यात आलेले वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले करून दिले व त्या उपक्रमांचा फायदा घेऊन स्वतःची उन्नती कशाप्रकारे करावी याबद्दल विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे महाविद्यालयाचे नाव देखील उंचावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा विशालजी अग्रवाल सचिव प्रफुलजी अग्रवाल अधीक्षक विजयजी मदनकर प्राचार्य डॉ. एस.एन.मूर्ती तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.