जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सायकल रॅली

Tue 04-Mar-2025,05:11 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत साई मुंबई च्या निर्देशानूसार फिट इंडिया सायकल ऑन संडे हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील खेलो इंडियाच्या तसेच इतर खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने चंद्रपूर शहरातून सायकल १० किलोमीटरपर्यंत जनजागृती घोषणा करीत रॅली काढण्यात आली.या उपक्रमाला खेलो इंडियाचे प्रशिक्षक रोशन भूजाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, मनोज पंधराम, नंदू अवारे, मोरेश्वर गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, संदिप उईके,रंजना शेवतकर व सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.प्रदुषणमुक्त व आरोग्यदायी उपक्रम : सायकल चालविणे हा शरारासाठी सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. याशिवाय प्रदूषणमुक्त शहर ठेवणे, इंधन बचत करणे, शारीरिकदृष्ट्या स्वतःला मजबूत ठेवणे, लांब पल्ल्याच्या आव्हानात्मक सायकल प्रवासातून खेळाडूंचा साहस विकसीत करणे, सायकल शर्यत व मनोरंजन, गुडघे दुखी व पाठीच्या कण्याचे आजारातून मूक्तता अशा विविधांगी दृष्टिकोनातून सायकलींग ची गरज व जागरुकता जनतेत रुजवण्यिासाठी फिटनेस का डोज अर्धा तास रोज म्हणत सायकल रॅली काढण्यात आली.