शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास आम्ही आमच्या प्रहार स्टाईल ने आंदोलन करणार - जयकुमार बेलखडे

समीर शेख : ( कारंजा घा )
कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी मौजा कुंडी येथील शेतकरी वर्षानुवर्ष आपली शेती करीत आहे. मात्र त्या ठिकाणी मे. ज्युनिअर ग्रीन एनर्जी कंपनीने सोलर एनर्जी प्लांट चालू करत असल्याने त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड टाकून शेतकऱ्यांचा शेतीला जाणारा रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी तहसीलदार कारंजा यांना निवेदनातून तोडगा काढण्याची मागणी केलेली होती.मात्र कोणत्याही प्रकारचा सकारात्मक तोडगा न निघाल्यामुळे शेतकरी आपल्या मागण्यांकरिता आजपासून आमरण उपोषणास सूरवात केली आहे. उपविभागीय अधिकारी आर्वी यांना दिनांक १३ जानेवारी ला शेतकऱ्यांनी निवेदन देऊन त्यांच्या निदर्शनात आणून दिले की कंपनी रस्त्यावरून येण्याजाण्यास मनाई करीत आहे. कंपनी चे काम थांबवावे व न्याय द्यावा अशी विनंती करून सुद्धा कंपनी चे काम चालूच आहे. स्वतःच्याच शेतात येण्या जाण्याचे बंद होण्याचे चिन्हे दिसत असल्याने
शेतकऱ्यांनी आज हतबल होऊन ज्या ठिकाणावरून येण्याजाण्यास कंपनी विरोध करीत आहे त्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले आमरण उपोषण आरंभ केलेले आहे. सदर भाग हा जंगली श्वपदांचा वास्तव्याचा असल्याने होणाऱ्या कोणत्याही हानिस शासन, प्रशासन व कंपनी प्रशासन जबाबदार असेल असे शेतकरी सांगत आहे. तसेच प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसीलदार कारंजा घा यांना निवेदनातून शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली, आंदोलनात सहभागी राजूभाऊ तेलखडे, रोशन वरठी, विजय डोंगरे, रामदास ठवरे, कमलाबाई डोंगरे, रंजनाबाई गजभिये, जिजाबाई गजभिये, पुंडलिक धोटे, नामदेव चिकने, मोहन डोंगरे, किशोरी डोंगरे, शामजी झामरे, अंबादास गजभिये, विनय डोंगरे, गीताबाई गजभिये, आर. बी. गजभिये, विठोबा कौरती, पुंडलिक कौरती, रामजी डोंगरे, विजय ठवरे रामचंद्रजी बांरगे यांसह अधिक शेतकरी उपस्थित होते