अमृत योजने अंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाचे मुख्याधिकारी यांना निवेदन

अब्दुल कदीर बख्श : हिंगणघाट
अमृत योजने अंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी व्हावी या करिता आज प्रदेश सरचिटणीस *अतुल वांदिले* यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
अमृत योजना मलनिस्सारण गटर लाईन योजने अंतर्गत झालेल काम पूर्ण न होता, पूर्ण झाल्याचे NOC नगरपालिकेतर्फे कंत्राटदारास देण्यात आली आहे का ? तसेच फेस १ चे काम पूर्णताः न झाल्यास फेस २ चे टेंडर नगर पालिके मार्फत घेण्यात आली आहे. याचे स्पष्टीकरण आपल्या विभागा तर्फे तसेच फेस २ मधून फेस १ च्या कामाचे ध्येय देत असल्याचे निर्दशनात येत आहे. त्याचप्रमाणे नफा फंड मधून पण कंत्राटदारास निधी वितरीत करण्यात आलेला आहे असे निर्देशनात येत आहे.
याकरिता वरील कामाबद्दल चौकशी करून फेस २ चे टेंडर हे रद्द करण्यात यावे.व तसेच फेस १ चे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जाहीर करण्यात यावे. असे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे जन आंदोलन करण्यात येईल असे निवेदन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांना दिले.यावेळी मुख्याधिकारी यांनी लेखी माहिती देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बालु वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, श्रीकांत भगत, सुशील घोडे आदी उपस्थित होते.