बल्लारशाह येथे वेगवेगळ्या ठिकाणी फाशी लावून दोघांची आत्महत्त्या

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : शहरात दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दोन जणांनी फाशी लावून आत्महत्या केल्याचे घटना घडली असून तसेच एक अनोळखी व्यक्तींचे प्रेत मिळाले . कन्नमवार वार्ड येथे एक व्यक्ती आपल्या राहते घरी चार दिवसापासून फाशी लावून आत्महत्या केली होती.रमेश लक्ष्मण पोजलवार (५०) असे मूतकाचे नाव आहे.दिनांक २७ फेब्रुवारी रोजी त्याच्या घरुन दुर्गंध येत असल्यामुळे आजुबाजुचे लोकांनी बल्लारपूर पोलिसांनी दिली. त्यावरुन पोलिसांनी त्याचे घर गाठत तपासणी केली असता त्याचे शव लटकत होते.मिळालेल्या माहितीनुसार चार दिवस अगोदर रमेश ने दारु पिऊन आपल्या पत्नी सोबत वाद केले होते.त्यामुळे त्याची पत्नी दीनदयाळ वॉर्ड येथील आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार करीत आहेत.तर दुसऱ्या घटनेत कळमना येथे एका युवकाने झाडाला फाशी लावून आत्महत्या केले. सूरज डॉक्टर पासवान (२५) असे मृतकाचे नाव आहे. कळमना येथे सूरज डॉक्टर पासवान (२५) रा. कटारिया धरमपुर जि. गाजीपुर (उत्तर प्रदेश) हा विश्वनाथ कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. काल सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्याचे शव झाडाला लटकून दिसले. कंपनी चे सुपरवायजर यांनी पोलीसांना माहिती दिली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रेताचे पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय झाडे करीत आहे. तर तिसरे प्रेत अनोळखी व्यक्तीचे असून त्याची ओळख पटली नाही आहे. याचे तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल कापगाते करीत आहे.