दोन महिलांनी चोरले सोने पोलिसात कच्ची तक्रार

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा :- शहरातील रत्नमाला चौकात दि.28 फेबृ ल दूपारी तीन वाजताच्या सुमारास दोन महिलांनी शकुंतला खवले वय 50, रा. जामनी याच्या पर्समधील कानातील सोने ची डबी चोरून नेल्याची घटना घडली.जामणी येथील रहिवाशी शकुंतला खवले याच्या घरी काही दिवसांवरच मुलींचे लग्न असल्याने त्यांच्या जवळ असलेले सोन्याचे कानातले तुटल्या मुळे त्या दि 28 फेब्रुवारीला सोनाराच्या दुकानात गेल्या, परतीला त्या चंद्रपूर नागपूर महामार्गावरील रत्नमाला चौकात बसची वाट पाहत होत्या, बस आल्यावर बस मध्ये चढत असल्याने दोन महिलांनी त्यांच्या पर्समधिल सोन्ये गायब झाल्याचे त्यांना पर्स उघडली तेंव्हा कळले. त्यांनी त्वरीत बस आनंदवन चौकात थांबाऊन परत ऑटोने रत्माला चौकात आल्या तेव्हा एकच गर्दी दिसली. त्यांनी त्या चोरी करणाऱ्या महिलांची ओळख तेथील लोकाना सांगितली ऑटो चालकाने हीच डबी आहे का विचारणा केल्यावर ओळख पटली, त्वरीत नागरिकांनी पोलिसांना बोलविले, पोलिसांनी महिलांना अटक केली, मात्र सोने जमा होणार असे सांगितल्यावर पोलिसांना कच्च्या तक्रारीवर सोने वापस केले. त्या दोन महिलांवर काय कारवाही करण्यात आली याची चर्चा मात्र सर्वत्र आहे.