ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव २०२५ च्या सबज्युनिअर,मॅरेथॉन व पोलिस भरती मैदानी पुर्व चाचणी स्पर्धेत हजारो अबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Tue 18-Feb-2025,08:14 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

ब्रह्मपुरी:- स्वराज्य संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती निमित्त दिनांक १५ व १६ फेब्रु. २०२५ ला ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समिती तर्फे ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती यामध्ये दिनांक १५ /२/२०२५ ला प्रथम टप्पा मॅरेथॉन स्पर्धा तर दिनांक १६/२/२०२५ ला द्वितीय टप्पा सबज्युनियर व तृतीय टप्पा पोलीस भरती मैदानी पूर्व चाचणी घेण्यात आली होती स्वराज्य संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज ,संत गाडगेबाबा व  देशाचे महान धावपटू "फ्लाइंग सीख" पद्मश्री कॅप्टन. मिल्खा सिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पअर्पण करून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ब्रह्मपुरी शहराचे प्रथम नगराध्यक्ष अशोक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली या क्रीडा महोत्सवाच्या पहिला टप्याच्या  मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात ६ किमी. मॅरेथॉन स्पर्धा तर १६  वर्षेआतील गटात ३ किमी. मॅरेथॉन स्पर्धा तर 35 वर्षावरील महिला व पुरुषांसाठी २ किमी .फास्ट वॉक स्पर्धा व दिव्यांग बांधवांसाठी १ किमी. वॉकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते  या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ब्रह्मपुरी शहराचे प्रथम नगराध्यक्ष अशोक भैय्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. देविदास जगनाडे सर अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल असो. प्रमुख अतिथी म्हणून भाऊरावजी राऊत सर ,डॉ. प्रशांत राखडे सर, ऍड. हेमंत उरकुडे सर डॉ. श्वेता राखडे मॅडम, इंजि. रामकुमारजी झाडे सर,राहुल लाखे,सुनील अवसरे,विष्णू पिल्लारे  उपस्थित होते या स्पर्धेत चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली ,नागपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील  व ब्रह्मपुरी शहरातील खेळाडूंनी सहभाग घेतला यामध्ये ६ किमी. पुरूषांच्या खुल्या गटातील  मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम प्रणय ज्ञानेश्वर मोहूर्ले ,द्वितीय सुरज साईनाथ बोटरे, तृतीय निखिल मंगलदास टेंभुर्णे यांनी पटकाविला तर महिला गटात प्रथम रुचिका सुनील नागरकर , द्वितीय तनिषा महादेव चीचमलकर ,तृतीय भाग्यश्री लेनगुरे यांनी क्रमांक पटकाविला तसेच १६ वर्षाआतील  मुलांच्या गटात प्रथम पीयूष संजय गायधनी ,द्वितीय अभय रामेश्वर मस्के ,तृतीय अखिलेश अशोक बुर्रे यांनी पटकाविला तर मुलींच्या गटात प्रथम श्रावणी संदीप खोब्रागडे ,द्वितीय मानसी शेखर फटिंग ,तृतीय संघवी अरविंद कापकर  यांनी पाटकविला २ किमी तीव्र चालण्याच्या स्पर्धेत .३५ वर्षावरील पुरुषांच्या गटात प्रथम रघुनाथ सौंदरकर, द्वितीय डॉ.पंकज बेदेकर ,तृतीय हिवराज सोमनकर क्रमांक यांनी पाठविला तर महिला गटात प्रथम प्रतिभा मनोज बोरकर, द्वितीय पापिता कुथे ,तृतीय अर्चना सुखदेव टिकले यांनी क्रमांक यांनी पटकाविला १ किमी चालण्याच्या स्पर्धेत  दिव्यांगाच्या पुरुष गटात प्रथम आदित्य उदासी द्वितीय देवा तर तृतीय दिवाकर यांनी पटकाविला तर महिला गटात प्रथम रोहिणी रोखडे द्वितीय साक्षी नंदपूरकर क्रमांक यांनी पटकाविला विजेत्या सर्व खेळाडूंना रोख ३०००,२०००, १००० रूपये , मेडल्स, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला तर स्पर्धेचा दुसरा टप्पा मधील सब ज्युनिअर अथलेटिक स्पर्धेत ५० मीटर रणींग स्पर्धेत ८ वर्षातील मुलांच्या गटात प्रथम देवांश राऊत ,द्वितीय कपिल विजकापे ,तृतीय आदित्य माकडे तर मुलींच्या गटात प्रथम नव्या लांजे,द्वितीय स्पृहा दोडके तृतीय पंखुडी निपाने क्रमांक यांनी पटकावला तर  टेनिस बॉल थ्रो स्पर्धेत ८ वर्षातील मुलांच्या गटात प्रथम आयुष उईके द्वितीय स्मित कोडापे तर तृतीय नील राखडे तर मुलींच्या गटात प्रथम नव्या लंजे ,द्वितीय अनुध्या घोनमोडे ,तृतीय ज्ञानेश्वरी श्रीरामे यांनी पटकाविला तर स्टॅंडिंग ब्रॉड जंप स्पर्धेत ८ वर्षातील मुलांच्या गटात प्रथम आदित्य माकडे, दुतीय स्मित सेलोकर, तृतीय श्लोक सोनटक्के तर मुलींच्या गटात प्रथम नव्या लंजे, द्वितीय आयात चावारे, तृतीय पंखुडी निपाने यांनी पटकाविला तर १०० मिटर रनींग स्पर्धेत १० वर्षातील मुलांच्या गटात प्रथम ओमखेत मैंद ,द्वितीय अथर्व सुक्रे, तृतीय अर्पित सोमनकार तर मुलींच्या गटात प्रथम स्नेहल फटिंग ,द्वितीय श्रेया लांडगे,तृतीय स्वरा करंडे