जी बी एम एम हायस्कुल व ज्यू कॉलेज मध्ये "अभ्यास कसा करावा" कार्यशाळा संपन्न

Fri 11-Oct-2024,03:36 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि :नदीम शेख हिंगणघाट 

 

 

हिंगणघाट:हिंगणघाट आजच्या मोबाईल च्या युगात मुलांना लगेच माहिती उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासात मागे पडत आहे.योजनाबद्ध अभ्यास करण्याची सवड कमी झाली आहे 

 या समस्ये चे निराकारण करण्याकरिता मातृवृक्ष बहुउद्देशीय संस्था व जी बी एम एम हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या संयुक्त विद्यमाने अभ्यास कसा करावा या कार्यशाळेचे आयोजन आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन 5 ऑक्टोबर या दिवशी करण्यात आले.प्रा अभय दांडेकर हिंगणघाट हे या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण व प्रभावी शैली ने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा व स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र व क्लुप्त्या सांगितल्या. कार्यशाळेची सुरवात प्राचार्य,पर्यवेक्षक आणि प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रम प्रस्तावना व आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक डॉ.अनिस बेग यांनी केले.उत्कृष्ठ संचालन दत्तात्रय पवार यांनी केले. कार्यक्रम दोन सत्रात झाले.माध्यन्तरी विद्यार्थ्यांना अल्पोहार सुद्धा देण्यात आला. बैठक व अल्पोहार व्यवस्था कला शिक्षक किशोर उकेकर व व्यवसाय शिक्षक त्रिरत्न नागदेवे यांनी केली.प्रा अभय दांडेकर यांच्या यांच्या मार्गदर्शन ने सर्व विद्यार्थी समाधानी झाले व सकारात्मक अभिप्राय दिला.कार्यक्रमाच्या शेवटी मार्गदर्शक प्रा दांडेकर यांना प्रमाणपत्र, स्मुर्तीचिन्ह व मानधन देऊन सत्कार करण्यात आला.तसेच योगायोगाने त्याच दिवशी जेष्ठ शिक्षक डॉ.अनिस बेग यांचे वाढदिवस असल्यामुळे त्यांना सुद्धा सर्वांन तर्फे प्राचार्य व पर्यवेक्षक यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.वर्ग 12 वी चे विद्यार्थी ज्यांनी उडान मोहत्सव 24 मध्ये विभागीय स्तरावर बक्षिस मिळविले कु स्वरांजली बोकारे,आमिष काझी व कु हर्षवाल त्यांचे सुद्धा प्रमुख पाहुणे अरविंद दहापुते यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरव करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य सुनील फुटाणे, उपमुख्याध्यापक कुरेशी,पर्यवेक्षक संजय तराळे,प्रा ठाकडा,प्रा दांडेकर,डॉ बेग,किशोर उकेकर,अरविंद दहापुते,अनिल वरकडे व त्रिरत्न नागदेवे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सिहाचा वाटा होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिस्तबंध ठेवण्यासाठी प्रा सोनकुसरे मॅडम, एस के नियाझी मॅडम व ठाकरे मॅडम उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण व माहितीपर कार्यक्रमा ची पालकांकडून प्रशंसा करण्यात येत आहे.