रस्त्याने चालता येत नाही तर गाडी कशी जाणार समता नगर नागठाणा नवीन वस्तीची दुरव्यवस्था

Wed 09-Oct-2024,05:19 AM IST -07:00
Beach Activities

निखिल बावणे वर्धा प्रतिनिधी

 

 

समता नगर नागठाणा वस्तीमध्ये गेल्या वीस वर्षापासून लोक राहत आहेत येथे लोकसंख्या 400 च्या जवळपास आहे येथील लोकांना नळ, पाणी,विविध सुविधांचा अभाव असतो 

पण सगळ्यात मोठा जो अभाव आहे तो रस्त्याचा आहे. प्रत्येक वेळेस ह्या नागरिकांना नाकारल्या जाते. येथील जे नागरिक आहेत ते कित्येकदा ग्रामपंचायतकडे निवेदन घेऊन गेले. रस्त्यासाठी येथील रस्त्याची जी व्यवस्था आहे ती फारच दुर्मिळ आहे. येथे रस्त्याने चालता सुद्धा येत नाही तर येथील नागरिक इथे कसे राहणार ? आपलं देश हे प्रगतीपथावर आहे परंतु जर देशातील रस्ते सुधारले नाही तर काय होईल ? ग्रामपंचायतला जो फंड येत असतो त्यामधून ग्रामपंचायतीने येथील नागरिकांना रस्ते बांधून द्यावे. यासाठी येथील नागरिकांनी कित्येकदा ग्रामपंचायतला अर्ज केले तरीही येथील नागरिकांना प्रत्येक वेळेस कुठलेही सहायता मिळाली नाही. येथील नागरिकांनी प्रयत्न करून निवेदन केले ग्रामपंचायतला तेव्हा कुठे ग्रामपंचायती रस्ता बांधून देतो यासाठी यांना आश्वासन दिले. पण तेही आश्वासन आजपर्यंत पूर्ण केलेले नाही. पावसाळ्यामध्ये येथील लोकांना चालता सुद्धा येत नाही ग्रामपंचायत ने खडीकरण करून देतो असे सांगितले. व त्यासाठी कोटेशन सुद्धा काढले. परंतु फक्त जेसीपी आणून बाजूचा नालीतला मुरूम काढून रस्त्यावर टाकला त्यामुळे पण इथे अडचण निर्माण झाली. कारण की पावसाचे पाणी त्या नालीमध्ये साजते व त्यामुळे डास वगैरे तयार होऊन येथील नागरिकांनाच बिमारीचा त्रास सोसावा लागतो. तर येथील नागरिकांचे टॅक्स सुद्धा काढले जाते पाण्याचे सुद्धा टॅक्स काढले जाते ह्या मधून जर नागरिक कर जमा करत असतील ग्रामपंचायत मध्ये. आणि येथील मतदार संघ सुद्धा वोट करत असेल. येथे दोन वार्ड. मेंबर सुद्धा आहेत ग्रामपंचायतचे तरीसुद्धा ह्या वस्तीकडे लक्ष दिल्या जात नाही. पावसाळ्यामध्ये येथील नागरिकांची अवस्था पाहून अक्षरचा प्रश्न पडतो की खरच आपला देश प्रगतीपथावर आहे का ?