वरोरा पोलीसांची मोठी कारवाई १ किलो ७५० ग्रॅम वजनाचा गांजा पकडला

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण, वरोरा
वरोरा :- शहरातील यात्रा वार्ड, वडार मोहल्ला वरोरा येथील पोचमल्लु दांडेकर वय 37 हा स्वतःचे राहते घरी मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने,फुले व बिया विक्रीकरिता बाळगुण आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून दि.1मार्च रोजी याच्या घराची झडती घेतली असता, त्याचे घरातून १ किलो ७५० ग्रॅम वजनाचा गांजा बाळगुण असतांना मिळून आल्याने त्याचे विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाक करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S. Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब), ii (ब) N.D.P.S. Act कायदा अन्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे रिजवान रंगरेज यास पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला असून सदर आरोपी हा फरार आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सपोनि. शरद भस्मे, पोउपनि. दिपक ठाकरे, पो. अं. संदीप मुळे, पो. अं. विशाल राजुरकर, पोहवा मोहन निषाद, संदीप वैदय, दिलीप सुर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे, महेश गावतुरे यांनी केली.