अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात विश्व संगणक दिवस साजरा

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा:शंकरलाल अग्रवाल महाविद्यालय सालेकसा येथे विश्व संगणक दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अपर्णा खुरसेल तर प्रमुख अतिथीपदी क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संजय बिरनवार ग्रंथपाल प्रा. राहुल कवाडे व सुनीता सुलाखे हे उपस्थित होते. आपल्या मनोगतामध्ये सुनिता सुलाखे यांनी विश्व संगणक दिवसाबद्दल माहिती सांगून त्या दिवसाचे औचित्य व महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना विशद केले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. खुरसेल यांनी संगणकाचे जीवनातील अनन्य साधारण महत्व व त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रातील फायदे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देऊन संगणकाबद्दल जास्तीत जास्त ज्ञान अर्जित करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ललिता शेंडे तर आभार प्रदर्शन कु.मोहिनी कटरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्रवेशित विद्यार्थी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.