आदिवासी महिलेला मारहाण केलेल्या त्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करा

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आदिवासी समाज संघटना तालुका आरमोरीचे मागणी
गडचिरोली:धानोरा तालुक्यातील चातगाव पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक जी.के.खटिंग यांनी मिजगाव च्या माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सरपंच सुगंधा उईके यांना व त्यांच्या मुलास शिवीगाळ करून लाता बुक्याने जबर मारहाण केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक जी.के.खटिंग यांच्यावर अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, व खोटी तक्रार देणाऱ्या पोलीस पाटलाला बडतर्फ करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी समाज संघटना,तालुका आरमोरी कडून करीत आहोत मिचगांव बु.व मिचगांव खू.येथील नागरीकामध्ये वाद सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलीस पाटील यांच्या खोट्या तक्रारीवरून सुगंधा उईके यांचा मुलगा विनोद उईके यास पोलिस चौकीमध्ये बोलाविले असता त्याच्यासोबत सुगंधा उईके सुद्धा पोलिस स्टेशनला गेले होते. सातगाव पोलीस चौकी चे पोलिस निरीक्षक जी.के.खटिंग यांनी या दोघाही मायलेकांना घाणेरड्या शिव्या देऊन लाता बुक्याणे जबर मारहाण केली. त्यानंतर सुगंधा उईके या चौकीतून बाहेर निघाल्या व त्यांच्या मुलाने त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले.याप्रकरणी खोटी तक्रार देणाऱ्या पोलीस पाटलाला बडतर्फ करण्यात यावा व पोलिस निरीक्षक जी.के.खटिंग यांच्यावर कठोर कारवाई करावी करून निलंबित करण्यात यावा,अशी मागणी आदिवासी समाज संघटना,तालुका आरमोरीच्या वतीने करण्यात येत आहे.अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली समोर आमरण उपोषण करण्यात इशारा सुद्धा आदिवासी समाज संघटना आरमोरीच्या वतीने देण्यात आहे.याप्रसंगी आदिवासी समाज संघटना तालुका आरमोरी चे सदस्य दिलीप घोडाम,विश्वेश्वर दररो,हरेंद्र मडावी,किरण घोडाम,गौरव सयाम, मनोज गावडे,रवींद्र नैताम,शीला उसेंडी,वनिता उईके,उर्मिला पुराण,पल्लवी उईके,प्रियंका ऊसेन्डी यासह अन्य सदस्य उपस्थित होते.घटनेबद्दल आदिवासी समाजात तीव्र संताप मिजगाव येथील सुगंधा उईके या आदिवासी महिलेला चातगाव पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक जी.के. खटिंग यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आदिवासी समाजात पसरतात आदिवासी समाजामध्ये तीव्र रोष व्यक्त करून त्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी समाजातर्फे करण्यात येत आहे.गृहमंत्री, जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,यांना दिले निवेदनमिसगाव येथील सुगंधा उईके व त्यांच्या मुलास जातिवाचक शिवीगाळ करून लाताबुक्याने जबर मारहाण केलेल्या प्रकरण पोलीस निरीक्षक जी.के.खटिंग यांना निलंबित करून तसेच कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध आदिवासी समाज संघटना तर्फे करण्यात येत असून याबाबतचे निवेदन गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हाधिकारी, गडचिरोली पोलीस अधीक्षक गडचिरोली,उपविभागीय अधिकारी देसाईगंज, यांना तहसीलदार तहसील कार्यालय आरमोरी यांच्या मार्फतीने देण्यात आले आहे.