आमगाव -देवरी मतदार संघातील पिपरिया, चिरचाळबांध, पुराडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी द्या-आमदार संजय पुराम

Mon 10-Mar-2025,02:43 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-आमगाव विधानसभा मतदार संघातील सालेकसा तालुक्यातील पिपरिया, आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध, व देवरी तालुक्यातील पुराडा गावात प्राथमिक आरोग्य केंद्राला त्वरित मंजुरी द्या असे निवेदन आमगाव विधानसभा मतदार संघातील आमदार संजय पुराम यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिले आहे. पिपरिया, चिरचाळबांध, पुराडा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सालेकसा तालुक्यातील विचारपूर, बिझली, पांढरवाणी, बोदलबोडी, कोटजभूरा, मुरकुटडोह/दंडारी, गांधींटोला, पाऊलदौना, आमगाव तालुक्यातील सीतेपार, सुरकुडा, बोरकन्हार, देवरी तालुक्यातील आमगाव, सुंदरी, इस्तारी, पळसगाव/धमदी, पीपरखारी, गडेगाव, मुरपार, व चादलंमेटा येथील आरोग्य उपकेंद्राचे प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आले असून निवेदन देते वेळी या संदर्भात आ.पुराम यांनी आरोग्य मंत्री आबिटकर यांचेशी सविस्तर चर्चा करून तात्काळ प्रभावाने मंजुरी प्रदान करण्यात यावे असा आग्रह केला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदार संघ अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग आहे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील ग्रामस्थांना प्राथमिक उपचारासाठी खूपलांब अंतरावरील आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे लागते परिणामी अनेक रुग्णांना रस्त्यातच आपला जीव गमवावा लागतो अश्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्यातील पिपरिया, चिरचाळबांध, व पुराडा ही गावे प्राथमिक आरोग्य केंद्र नसलेले जिल्हा परिषद गट प्रभाग आहे. यामुळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळावी, यासाठी आ. पुराम यांनी आरोग्य मंत्री आबिटकर यांचेशी चर्चा केले यावर लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिले आहे.