प्रगती कॉलनी सालेकसा च्या वतीने जागतिक महिला दिन संपन्न

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-प्रगती कॉलनी सालेकसा येथे जागतिक महिला दिन सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर बारसे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन अंबरलाल मडावी सहाय्यक वनसंरक्षक(सब DFO) गडचिरोली याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संजय बारसे, लोकमत सखी मंच संयोजिका किरण मोरे, सामाजिक कार्यकर्त्या लता फुंडे, पंचायत समिती सदस्य अर्चनाताई मडावी, ग्राम महसूल अधिकारी स्मिता मेंढे, केशरबाई बारसे, सखी मंच प्रतिनिधी दिपाली बारसे, ममता चुटे तसेच मोठ्या संख्येने सखी मंच प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि स्वागत करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना पंचायत समिती सदस्य अर्चना मडावी म्हणाल्या महिलांनी आत्मविश्वास जागृत करून आत्मसन्मान प्राप्त करावे त्यामुळे स्त्रीया खऱ्या अर्थाने जागृत होऊन स्वाभिमानाने जगतील याप्रसंगी उपस्थित विविध महिलांनी याप्रसंगी महिलांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केली होती अनेक महिलांनी आपले मनोगत गीत गायनाने व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन मनीषा शेंडे यांनी तर कार्यक्रमाचे आभार मेगा चुटे यांनी मानले.