वेगवान वाहनाला लागला ब्रेक शहरातील मुख्य मार्गांवर गतिरोधक

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा:- शहरात जाणाऱ्या सिमेंट रस्त्यांवर चौकाचौकात गतिरोधक लावण्यात आल्याने शहरातून होणाऱ्या वेगवान वाहनाला ब्रेक लागल्याने वृद्ध व्यक्ती मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.सिमेंट रस्त्यांमुळे शहर सुंदर झाले खरे, त्या बरोबरच रस्त्यांच्या कडेला वाढलेली अनधिकृत दुकानेही वाढले परिणामी रस्त्यावरील फूटपाथ वरून चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही एवढेच नव्हे तर या रस्त्यामुळे सुसाट वेगाने चालणारी दुचाकी वाहन, चारचाकी वाहने यांचाही वेगही वाढला परिणामी रस्त्याने नेहमीच लहान मोठ्या दुर्घटनात वाढ झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबांमुळे दुर्घटना होऊनही नगर परिषद मुख्याधिकारी, माजी नगराध्यक्षला ही जाग आली नाही. शहर सुंदर बनविण्याच्या लोभात मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले असेच दिसून येत आहे. मात्र उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली नी रस्त्यावर वेगनियंत्रक बसविण्यात आली त्यामुळे काही प्रमाणात वेगावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झाले आहे. शालकरी विद्यार्थी, वयोरूद्ध नागरिक मात्र जीवाला होणाऱ्या होणारा त्रास कमी होणार यासाठी समाधान व्यक्त करीत आहे.