ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समिती तर्फे जागतिक महिला दिन साजरा

Sat 08-Mar-2025,02:21 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

ब्रह्मपुरी :- शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समिती तर्फे आज दिनांक ८ मार्च २०२५ शनिवार ला सकाळी ७:०० वाजता जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड.श्रुती बोरकर,डॉक्टर श्वेता राखडे,लतिका लाखे पोलिस अधिकारी उपस्थित होते प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,त्यागमूर्ती रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पाअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.श्वेता राखडे यांनी आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार महिलांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील समस्या व त्यावर उपाय व्यायम व पौष्टिक आहार याबद्दल मार्गदर्शन केले तर ॲड.श्रुती बोरकर यांनी संविधानात आपल्याला मिळालेले हक्क व नमूद असलेले कायदे व भारतीय न्याय सहिता २०२३ मद्ये आसलेल्या महिलांविषयी कायद्याबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समितीचे पदाधिकारी राहुल जुआरे ,विजय ठाकरे, प्रफुल नागापुरे, निशांत झाडे, विहार मेश्राम व बहुसंख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन विहार मेश्राम यांनी तर प्रास्ताविक राहुल जुआरे व आभार प्रफुल नागापुरे यांनी मानले.