ग्रामसेवक विकास तेलमासरे व सरपंच श्रीमती नलीनी तलांडे यांचेवर अँन्टी करप्शन ब्युरो ची कारवाई

Thu 06-Mar-2025,05:09 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा 

चंद्रपूर:-ग्रामपंचायत अजयपूर, चंद्रपूर येथील ग्रामसेवक विकास सुधाकर तेलमासरे यांनी ५,०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने व सरपंच श्रीमती नलीनी दामोधर तलांडे यांनी १०,०००/- रूपये लाच रक्कम मागणी करण्याची तयारी दर्शविल्याने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज दि. ०६/०३/२०२५ रोजी कार्यवाही केली.तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांनी मौजा अजयपूर येथे शेतजमीन खरेदी केलेली आहे. तक्रारदार यांना सदर शेतजमीनीचे फेरफार ग्रामपंचायतीमध्ये नोंद करणेकरिता आणि सदर शेतजमीनीवर कुकुटपालनाचा व्यवसाय करणेकरीता नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे तकारदार यांनी दिनांक ०८/०१/२०२५ रोजी ग्रामपंचायत अजयपूर येथे रितसर कागदपत्रे सादर केली होती. दि. १४/०२/२०२५ रोजी झालेल्या आमसभेमध्ये तक्रारदार यांचा फेरफारचा विषय ठेवण्यात आला होता. आमसभेच्या दिवशी इलोसे क. २ सरपंच श्रीमती नलीनी तलांडे यांनी तक्रारदार यांना १०,०००/- रू. लाच रक्कमेची मागणी केली. त्यानंतर त्याचदिवशी आलोसे क. १ ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विकास तेलमासरे यांनी सुध्दा तक्रारदार यांना फेरफार ग्रामपंचायतीमध्ये नोंद करणेकरीता व कुकुटपालन व्यवसायाकरीता नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरीता १०,०००/- रू. मागणी केलेली होती. परंतु तक्रारदार यांना ग्रामसेवक , सरपंच यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन दिनांक ०१/०३/२०२५ रोजी तक्रार दिली.तक्रारीवरून दि. ०४/०३/२०२५ व ०५/०३/२०२५ रोजी तेलमासरे स्वतः करीता तडजोडीअंती ५०००/- रू. सरपंच यांचेकरीता १०,०००/- रूपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.त्यावरून आज दि. ०६/०३/२०२५ रोजी सापळा रचून पंचायत समिती कार्यालय चंद्रपूर येथील मुख्य प्रवेशद्वारा जवळ ५,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.नलु तलांडे करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्यान पुढील तपासकार्य सुरू आहे. सदरची कार्यवाही दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर,संजय पुररंदे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ/ रमेश दुपारे, पो. हवा. हिवराज नेवारे, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर,म.पो.शि. मेघा मोहुर्ले, चापोशि/सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चापोशि संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.