महाबोधी विहार हे बौद्धाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आरमोरीत धरणे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी:बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आरमोरी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून ४ मार्च ला तहसिल कार्यालयासमोर रखरखत्या उन्हात धरणे आंदोलन करून तहसीलदार मार्फत राष्ट्रपती व बिहार सरकारला निवेदन देण्यात आले.देशातील विविध धार्मिक स्थळे ही त्या त्या धार्मिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आलेली आहेतः . मात्र बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे मात्र अजूनही बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले नाही. याकरिता गेल्या ५० वर्षापासून भारतातील बौद्ध समाज आणि बौद्ध भिक्षू यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालवलेले आहे . तरीही अजूनही शासनाने सदर महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलेले नाही. ही बाब अत्यंत चुकीची व संपूर्ण भारतातील बौद्धांवर अन्याय करणारी आहे. सदर महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. या मागणीसाठी सकाळी आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारात तालुक्यातील बौद्ध उपासकांनी एकत्र येऊन व विहारातील तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून वंदन करुन धरणे आंदोलनात सुरुवात करण्यात आली यावेळी विहारापासून तर तहसील कार्यालयापर्यंत रखरखत्या प्रखर उन्हात पंचशील ध्वज हातात घेऊन व महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करून घोषणा देत बौद्ध उपासक उपसिका मोठया संखेने तहसिल कार्यालया समोर पोहचले व उन्हातच जवळपास तीन ते चार तास धरणे आंदोलन केले. यावेळी अनेक वक्त्यांनी आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.आंदोलनानंतर बौद्ध उपासकांनी राष्ट्रपती बिहारचे राज्यपाल मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत निवेदनही सादर केले. धरणे आंदोलनात धर्माजी बांबोळे, विजयकुमार ठवरे, वेणूताई ढवगाये , खिरेंद्र बांबोळे, प्रा . अमरदीप मेश्राम विनोद शेंडे ,ताराचंद नागदेवे, जयकुमार शेंडे,प्रशांत खोब्रागडे, कमलाकर तुंबडे, किशोर सहारे डॉ.प्रदिप खोब्रागडे, रामहरी वाटगुरे,हरिदास सहारे, हिरालाल वालदे, भारती मेश्राम,अंजली रोडगे,, कुमता मेश्राम प्रज्ञा निमगडे,मिना सहारे, विद्या चौधरी, संगीता रामटेके,सिद्धार्थ साखरे, भिमराव मेश्राम भावना बारसागडे,कल्पना ठवरे, किरण बांबोळे, लता बारसागडे,अनुराधा रामटेके ,सुशीला कोल्हटकर,सुलभा बोरकर, कुंदा झाडे,मीना सहारे,गया जनबंधू, लता बारसागडे, वनमाला सुखदेवे,यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.