बुद्धगयातील महाबोधी महाविहारचा ताबा बौद्ध समाजाला द्या बल्लारपूर मध्ये आंदोलनाची तयारी

Fri 07-Mar-2025,02:32 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धाचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय .या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धाच्या ताब्यात नाही.ते बौद्धांच्याच ताब्यात असावे,यासाठी विविध संघटनांकडून बल्लारपूर मध्ये ७ मार्च ला आंदोलन केले जाणार आहे. आंदोलन करुन निवेदन पाठविण्यात येणार आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार हिंदु पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धाच्या हातात द्या.अशी मागणी देशभरातून केली जात आहे. बल्लारपूर मध्ये देखील या मागणीसाठी महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे. बुद्धगया मंदिर कायदा,१९४९ नुसार महाबोधी महाविहाराला संपूर्ण व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रत्येक निर्णय घेण्यासाठी नऊ सदस्यिय समिती असेल.या नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य हिंदू असतील व चार सदस्य बौध्द असतील. या नऊ सदस्यीय समितीमध्ये एक सदस्य गया जिल्हयाचे जिल्हा दंडाधिकारी असतील. तेच या समितीचे अध्यक्षसुध्दा असतील. त्यापुढे जाऊन हा कायदा म्हणतो की, गया जिल्हयाचे दंडाधिकारी हे गैरहिंदू असतील, गैरहिंदूंची संख्या अधिक असल्याने या समितीचे अध्यक्ष कोणाताही बौद्ध होऊ शकणार नाही. तसेच सरकार एकूण सदस्यांपैकी, अध्यक्ष म्हणून हिंदूचीच निवड करेल. त्यानंतर या कायद्यानुसार समितीची बैठक घेण्यासाठी, विहाराबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी कमीत कमी ४ सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे. समितीवर ५ सदस्य हिंदूच असतात.म्हणजे उरलेले ४ बौध्द सदस्य नसले तरी विहाराबाबतचा प्रत्येक निर्णय घेतला जातो.असा आरोप बौद्ध बांधवांचा आहे.महाबोधी महाविहार याबाबत सर्व निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार बौध्द समाजाला घेण्यासाठी बुध्दगया मंदीर कायदा, १९४९ हा कायदा तत्काळ प्रभावाने रद्द करुन महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात देण्यांत यावे अशी मागणी करण्यात येणार आहे.७ मार्च रोजी बल्लारपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ सकाळी १०.३० वाजता पासून भदंत धममघोष मेत्ता व भंते सुचित्त बोधी यांच्या नेतृत्वात भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार.