ढोल ताशा चोरीचा गुन्हा उघड

अरबाज पठाण ( वर्धा )
वर्धा येथील लोकेश अमर निनावे राहणार रामनगर वर्धा हे श्रीराम युवा बँड पथकाचे प्रमुख असून ते बँड पथकाचा सराव महात्मा गांधी हायस्कूल बजाज चौक वर्धा येथे करीत असून त्यातील सर्व साहित्य ढोल ताशा पथक हे महात्मा गांधी हायस्कूलचे एका रूम मध्ये ठेवत असायचे.
दिनांक 01/08/2024 ते दिनांक 06/08/2024 दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्या रूमचे लॉक तोडून एक चिकोडी ढोल ताशा कि 15,000 रुपये व एक बॅटरी कि 4500 रुपये असा एकूण किंमत 19,500 रुपये चा माल चोरून नेला त्यावरून पोस्टला गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर असे सोबत असलेल्या पोलीस स्टॉपसह , पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार असे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर मार्फत खबर मिळाली की, सदरची चोरी ही एका अल्पवयीन मुलाने केली असल्याने त्याच्या जवळून एक चिकोडी ताशा त्याचे वडीला समक्ष कि 15,000 रु माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई हि पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर, अपर पोलीस अधीक्षक सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक पराग पोटे ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात सपोनी विकास गायकवाड, राम ढगे गुन्हे प्रगटीकरणाचे प्रमुख पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पंकज भरणे पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली आहे