गण गणात बोते च्या गजराने आरमोरी शहर दुमदुमले आरमोरी येथे निघाली श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीची भव्य मिरवणूक

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :- (श.प्र.) शिवाजी चौक आरमोरी यांचे सौजन्याने श्री संत गजानन महाराज यांचे १४७ व्या प्रकट दिनानिमित्त स्थानिक गजानन महाराज मंदिराजवळ श्रीमद हरिनाम भागवत प्रवचन मागील सात दिवसापासून सुरू आहे. आज शेवटच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज यांचे १४७ व्या प्रकट दिनानिमित्त संपूर्ण आरमोरी शहरातून श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची तसेच पालखीची हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात विविध ठिकाणी आतषबाजी करून या पालखीचे जागोजागी स्वागत करण्यात आले. यावेळी “गण गण गणात बोते" व गजानन महाराज की जय च्या गजराने संपूर्ण आरमोरी शहर दुमदुमले होते.आज सकाळी गजानन महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक निघणार आहे म्हणून, आरमोरी येथील स्त्रियांनी आपापल्या अंगणासमोर व रस्त्याच्या बाजूला रांगोळ्या काढल्या होत्या.सकाळी ९.३० वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर आरमोरी येथून पालखीच्या मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. या मिरवणुकीत आरमोरीकरांना बघण्यासाठी विविध धार्मिक झाक्यां काढण्यात आल्या. राधा-कृष्ण,श्री संत गजानन महाराज दरबार,महाकाली, मा भवानी,शेषशाही महादेव, संत तुकाराम, विठ्ठल रुक्माई,महाकाल, भूत,वेताळ,अघोरी,नंदी बैल यांच्या जिवंत झाक्या मिरवणुकीत दाखविण्यात आल्या. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या पुरुषांनी शुभ्र वस्त्र व डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती,तर स्त्रियांनी पिवळी व भगवी वस्त्र परिधान केलेली होती,तसेच मराठी शाही भगवा फेटा लावून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक संस्कृतीचे दर्शन या मिरवणूकीने घडवून आणले.त्यामुळे सर्वत्र वातावरण भक्तिमय होऊन मिरवणुकीने डोळ्यांचे पारणे फेडले. “गण गणात बोते " च्या गजराने व ब्यांड व डीजेच्या तालावर, गजानन महाराजांच्या गाण्याने शहरातील तरुणाई थिरकली होती. ढोल,ताशा,मृदंगाच्या गजरात जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे भाविक यात सहभागी झाले होते.दिंडी,मृदंग व टाळाचे ठेका धरत वारकरी संत गजानन महाराजांच्या गाण्यावर आनंदाने नाचत होते. आरमोरी येथील माँ भगवती भजन मंडळाचे संगीत पथक 'गण गणात बोते' चा गजरासह विठ्ठल व श्रीरामाचे भजन करीत होते. तसेच शिवाजी चौकातील कलाकारांनी सदर मिरवणुकीत शिव तांडव व अघोरी नृत्य डान्स करून त्यात रंगत आणली.तसेच या मिरवणुकीत शिवाजी चौक,पटेल चौक,व विठ्ठल मंदिर चौकातील महिलांनी लेझीम नृत्य सादर करून, या मिरवणुकीत आनंद दिला.सदर मिरवणूक ही जवळपास एक की. मी.लांब होती. सदर मिरवणूक बघण्यासाठी आरमोरीकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.सदर मिरवणूक संपूर्ण शहरात फिरून, समारोप संत गजानन महाराज मंदिरात करण्यात आला. यानंतर भागवत प्रवचनकार परम पूज्य साध्वी अनुपमाताई पिंपळकर यांच्या हस्ते गोपालकाला होऊन जवळपास १२ हजार भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.यानंतर वडसा येथील कलाकारांनी धार्मिक सुगम संगीताच्या कार्यक्रमाने आणखी रंगत आणली.आरमोरी विधानसभा क्षेत्रातील माजी आ. कृष्णा गजबे,आ.रामदास मसराम, प्रकाश सावकार पोरेड्डीवार,भाग्यवान खोब्रागडे मनोज वनमाळी,तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी आज आरमोरी शहरातील सर्वात मोठया या उत्सवात सहभागी होऊन गजानन महाराज यांचे मूर्तीचे दर्शन घेतले.तसेच आरमोरी शहरातील सर्व दुर्गा व गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.काही अनुचित घटना घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.या मिरवणुकीत उत्सव मंडळ कार्यकारिणीचे मनोज मने ,गणेश फुलबांधे,पुंडलिक हूड, सागर मने, भूषण सातव, सागर मने,दिलीप सातव ,सुभाष गरफडे, दादाजी भोयर, शामराव गरफडे,अविनाश गाढवे,रूपेश वाकडे, शरद भोयर, शंकर सातव, दिनेश भडके, नितीन राणे, करण सपाटे, मंगेश हूड, रवी डोकरे,महेश सातव, किरण गोंधोळे, चांगदेव सपाटे, सागर मने,दिनेश गरमळे,नितीन गोंधोळे, धनराज मंगरे, विजय भडके,संजय बिडवाईकर, शामराव गरफडे, निखील सावसाकडे, विजय सपाटे, संतोष भोयर, प्रदीप गरफडे, दिनेश भडके,रामकृष्ण गाढवे ,पियुष गिरडकार, लोकनाथ काणतोडे,रुपेश गजपुरे,साक्षी भोयर,विनोद मने,कमल हूड, सुभद्रा पिंपळकर, अनुसया सपाटे, ललिता मने, लता डोकरे, मंदा गरफडे, प्रभा गोंदोळे, पूर्णा हुड,यासाहित शहरातील प्रतिष्ठित, गणमान्य व्यक्ती,विद्यार्थी तसेच आरमोरी तालुक्यातील हजारो भाविक भक्त सहभागी झाले होते.