वर्धा जिल्हा क्रीडा संकुल होणार जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा

Fri 07-Feb-2025,06:30 AM IST -07:00
Beach Activities

अरबाज पठाण ( वर्धा )

 

वर्धेचे पालकमंत्री व राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धेत जिल्हास्तरीय आर्चरी धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर आयोजन वर्धेतील संस्कार बहुउद्देशीय संस्था वर्धा द्वारा आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा येत्या नऊ तारखेला जिल्हा क्रीडा संकुल येथील आर्चरी च्या मैदानावर होणार आहे. येथे संपूर्ण जिल्ह्यातून 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली यांची खुली स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धे करिता प्रथम, द्वितीय, तृतीय, तथा प्रोत्साहन पर बक्षीस रोख रकमे सोबत देण्यात येणार आहे. 

वर्धेतील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी सहभाग घेऊन ऑलिंपिक स्तरावर स्वतःच्या कलेचे प्रदर्शन दाखवून वर्धा जिल्ह्याला बहुमान मिळवून देण्याकरिता सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र काकडे यांनी खेळाडूना केलेले आहे