सालेकसा नगरपंचायत येथील विविध समस्या सोडवा सफाई कामगार यांना कायमस्वरूपी करा

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
गोंदिया: सालेकसा नगर विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त संपूर्ण राज्यासह गोंदिया जिल्ह्यातील नगर विकास मंत्रालय मार्फत महाराष्ट्रात चालवीत असणाऱ्या विविध समस्यांना घेऊन नगरपंचायत येथील सफाई कामगार यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मानधनात वाढ होत नसल्यामुळे त्यांच्यावर कमकुवत मानधनावर व तुटपुंज्या मानधनावर काम करावा लागत आहे या मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्यातील सफाई कामगारांचे टेंडर येत्या फेब्रुवारी मार्च महिन्यात संपत आहे मात्र अजून पर्यंत नगर विकास मंत्रालयाने नवीन टेंडर करिता नियोजन केली नाही सदर समस्याचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी ही केली जात आहे.विशेष म्हणजे शासकीय सफाई कामगारांना मिळणाऱ्या वेतनात शासनाप्रमाणे वेतन वाढ करण्यात यावे सफाई कर्म कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करून ड श्रेणी प्रमाणे मानधन मिळावे,सफाई कामगारांना डीबीटीप्रमाणे बँक खात्यात मासिक वेतन मिळावे,ठेका पद्धती बंद करावे,भूमिहीन कामगारांना घरकुल द्यावे, सफाई कामगारांना शासनाप्रमाणे जीवन विमा व आरोग्यसेवा देण्यात यावे, सफाई कामगारांना घरकुल योजनेत वेगळाच प्रावधान देण्यात यावे, भूमिहीन सफाई कामगारांना पक्के घरकुल मिळावे तसेच सफाई कामगारांना विविध योजना देण्यात यावे, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभाग गोंदिया यांच्याकडे सुद्धा मागणीचे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदन कुवर मोतीराम साखरे,आनंद सेउतकर,भिवराम भास्कर आकाश भसमोटे,मनीष तिराले,अनिल नेवारे,अनिता राऊत,पुष्पा भसमोटे,वनिता चावके,परमिला कटरे,उषा चूटे,रमेश मलगाम,माणिक राऊत,कमलेश पंधरे,रघु सुउतकर,गौरव तिडके,रवी नेवारे,मनीष शेंद्रे,यांयासह नगरपंचायत येथील सफाई कामगारांनी मागणी केली आहे.