रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची समस्या प्रवाशांची होत आहे गैरसोय

Sat 15-Feb-2025,12:58 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा:हावडा मुंबई रेल्वे महामार्ग येथून नेहमी धावत आहे व रेल्वे चे माध्यमाने अनेक ठिकाणी सध्या काम प्रगतीपथावर आहे, परंतु रेल्वे प्लॅटफॉर्म बांधून काय साध्य करणार असा संतप्त सवाल हे प्रवाशांकडून केला जात आहे. एकीकडे ट्रेनच्या इंजिनिअर व सेंट्रल गव्हर्मेंट भारत सरकार हे स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सव यापूर्वी करण्यात आला परंतु आजही स्वातंत्र्याच्या 75 ते 76 वर्षानंतर हे प्रवाशांना मूलभूत गरजा पासून आजही वंचित केले जात असल्याचे चित्र सध्या रेल्वे विभागात दिसत आहे. विशेष म्हणजे पूर्व महाराष्ट्राच्या व संपूर्ण देशाच्या मध्यप्रदेश छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेला विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा दरेकसा एक शेवटच्या टोकावर रेल्वे स्टेशन म्हणून यांची निर्मिती केली गेली आहे मात्र आजही रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रेल्वे विभागात एकीकडे सेंट्रल भारत सरकार हे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे मात्र रेल्वे स्टेशन हे चकाचक करून किंवा उधळ मलमपट्टी करून प्रवासांचे समाधान होणार नाही तर रेल्वे प्रशासनाने व भारत सरकारने तसेच जन लोकप्रतिनिधीने आणि रेल्वे येथील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी उशिरा वारंवार होत असलेल्या ट्रेन संदर्भात काहीतरी उपाययोजना करून प्रवाशांना वेळेच्या आत कसे पोहोचता येईल याचे सुद्धा नियोजन करावे आजही बऱ्याच ट्रेन उशिरा चालत असल्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असते तसेच झाले का साहित्य गेल्या कित्येक वर्षापासून दुपार पाडीत लोकल ट्रेन द्या व हावडा अहमदाबाद इंटरसिटी ट्रेनच् थांबा देण्यात यावा अशी मागणी अनेक सामाजिक संघटना,पत्रकार संघटना,व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, प्रवाशांनी सुद्धा अनेक निवेदन मोर्चे आंदोलन केले परंतु आजपर्यंत साले कसा येथे साधी इंटरसिटी किंवा हावडा अहमदाबाद एक्सप्रेस थांबत नाही ही एक शोकांतिका म्हणावा लागेल.रेल्वे प्रशासनाने व भारत सरकारने हे आदेश स्पष्ट करायला पाहिजे की सालेकसा तालुक्याचे ठिकाण आहे की नाही हेच त्यांना माहीत नसेल कदाचित असाही सवाल प्रवासी करू लागले आहेत कारण इंटरसिटी हावडा अहमदाबाद ट्रेन तालुक्याच्या ठिकाणी थांबत ते तर सालेकसा तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा इंटरसिटी व हावडा अहमदाबाद एक्सप्रेस का बरं थांबत नाही त्यामुळे रेल्वे प्रशासन लोक जनप्रतिनिधीच् संदर्भात विरोधात नाराजीच् सूर दिसत आहे. गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुका हा महाराष्ट्रात येत असून रेल्वे प्रशासनाने गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस ही सालेकशापासून सोडण्यात यावी तर ट्रेनवर नाव लिहिण्यापेक्षा प्रत्यक्षात सालेकशापासून सुरुवात करण्यात यावी कारण की शालेकसा तालुका हा विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्र सुद्धा येत असते तसेच गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस हीसुद्धा सालेकशावरून सोडण्यात यावी अशी मागणी ही केली जात आहे.