गिरोला येथील रानमेवा अंतर्गत विविध कामांना रोजगाराची संधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 25 लाखाचे काम मंजूर

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा:गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत गिरोला येथील रानमेवा पार्क येथे सामूहिक वन हक्क अधिकार समिती महोत्सव मार्फत जवळपास दहा एकरच्या परिसरात एक रहस्य निसर्गमय वातावरण तयार व्हावा व जनसामान्य माणसांना ऑक्सीजन मिळावा म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर झाले असून आणि झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुरूच असल्याने गावातील ग्रामस्थांना एक प्रकारे रोजगार च्या संधी सुद्धा उपलब्ध झाले आहेत व यासाठी सतत पाठपुरावा येथील सरपंच रविता विश्वनाथ मेंढे यांच्यामार्फत वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगराज पुंडे त्याचबरोबर रोजगार सेवक विनोद बहेकार व मजूर वर्ग सामाजिक संघटना महिला बचत गट ग्रामपंचायत पदाधिकारी व नव्य व्यवस्थापन समिती पदाधिकारी सामूहिक व न हक्क अधिकार समिती महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती,शाळा व्यवस्थापन समिती, आरोग्य समिती, पाणी पुरवठा समिती यांच्या पुढाकाराने बोदलबोडीवरून सालेकशाकडे जाणाऱ्या रानातलाव हे एक मोठे तलाव असून येथे पोलीस भरतीमध्ये प्रशिक्षण देणाऱ्यांचे सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण केंद्र च्या माध्यमातून शाळेकडे विद्यार्थी येथे नेहमीच पटांगण सोबत असल्याने पोलीस भरती या माध्यमाने या ठिकाणी प्रशिक्षणाचे धडे सुद्धा घेतले जात असतात. उन्हाळ्यामध्ये फार मोठा थंडगार हवा सुद्धा याच ठिकाणी नेहमी मिळत असते.सदर या रानमेवा पार्कमध्ये अनेक युवकांना रोजगार सुद्धा मिळाले आहे त्यामुळे स्वच्छ गाव सुंदर गाव ही संकल्पना राबवत असल्यामुळे एक नवीन वाटचाल सुरू झाली आहे त्यामुळे गावातून आजूबाजूच्या परिसरात सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.
प्रतिक्रिया
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता रानमेवा पार्क याकरिता गावच्या युवकाकडून व इतर सामाजिक कर्त्याकडून सामाजिक बांधिलकी ठेवून दररोज श्रमदानातून हे रानमेवा पार्कचे काम केले जात आहे परंतु शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे जर शासनाने रानमेवा पार्क करिता निधी दिली तर निश्चित या रानमेवा पार्क ला एक नवचैतन्य व सुजलाम सुफलाम होणार यात मात्र शंका नाही.रविता विश्वनाथ मेंढे सरपंच ग्रामपंचायत गिरोला