एका रुपयात नोंदणीच्या नावाखाली महीला कामगारांची फसवणूक हजारोंच्या संख्येने महिलांनी गाठले पोलिस स्टेशन

Fri 14-Mar-2025,09:37 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

वरोरा : वरोरा शहरात एका संस्थेने महीला कामगारांना केवळ एक रुपयात नोंदणी करून पेटी व भांडे वाटप करण्याचा संदेश प्रसारित केला.सदर संदेशामुळे हजारो महिला कामगार रात्रीपासून रांगेत उभ्या राहिल्या.मात्र प्रत्यक्षात ८०० ते १००० हजार‌‌ रुपये घेतल्याची बाब समोर येतांच गोंधळ उडाला आणि संतप्त महीला कामगारांनी वरोरा पोलिस स्टेशन गाठले.संस्थेच्या फसवणुकीचा प्रकार उघड वरोरा शहरातील रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागात असलेल्या एका संस्थेने ११ मार्च रोजी महीला कामगारांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली.फक्त एका रुपयात नोंदणी करून १२ मार्च रोजी भांडे व पेटी मिळणार असल्याचा संदेश त्यांनी दिला.त्यामुळे महिला रात्रीपासूनच मोठ्या संख्येने रांगेत उभ्या राहिल्या.मात्र नंतर या संस्थेने भांडे व पेटीसाठी प्रत्येकी ८०० ते १ हजार रुपये मागितल्याचे समोर आले.यामुळे संतप्त महिला कामगारांनी घटनास्थळी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.उबाठा युवा सेना संपर्कप्रमुख मनीष जेठानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप केला आणि अधिकची रक्कम घेऊ नये,असे ठणकावून सांगितले.कामगार कार्यालयाची भूमिका स्पष्ट -या घटनेची चौकशी केली असता,भांडे व पेटी वाटपाचे काम चंद्रपूर कामगार कार्यालयातर्फे करण्यात येते.वरोरा शहरात कोणत्याही खाजगी संस्थेला हे काम देण्यात आलेले नाही,असे स्पष्ट झाले. आपली फसगत होत असल्याचे लक्षात येताच हजारो महिला कामगारांनी थेट वरोरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.युवा सेनेची मागणी : दोषींवर कारवाई व्हावी -या प्रकरणात अधिकची घेतलेली रक्कम परत करण्यात यावी,तसेच संबंधित संस्थेवर कारवाई केली जावी,अशी मागणी उबाठा युवा सेना संपर्कप्रमुख मनीष जेठानी यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भांडे व पेटी वाटपाचे काम नगरपरिषद व पंचायत समितीकडे सोपवण्यात यावे,अशीही मागणी करण्यात आली आहे.या प्रकारामुळे वरोरा शहरात संतापाची लाट उसळली असून,संबंधित संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला कामगारांकडून केली जात आहे.