वरोरा पोलीसांची मोठी कारवाई,आरोपीकडून १ किलो ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त

Thu 13-Mar-2025,08:16 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा

वरोरा:- वरोरा पोलीस स्टेशन येथील पो.स्टे. प्रभारी अधिकारी आणि डी. बी. स्टॉप सह होळी सणानिमीत्त अवैध्य धंदयावर रेड कामी पेट्रोलिंग करीत असतांना एक ईसम मौजा टेमुर्डा चौकात संशयीतरित्या हातात बॅग घेवून उभा दिसला वरून त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याने स्वतःच्या आर्थिक फायदया करीता मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीचे पाने, फुले व बिया यांची विक्री करण्याकरिता सदर आरोपीच्या जवळ असलेल्या निळया/काळया रंगाच्या बॅगमध्ये १ किलो ९९२ ग्रॅम वजनाचा गांजा बाळगुण असतांना मिळून आल्याने आरोपी नामे प्रफुल किशोर रामटेके वय २९ वर्ष रा. कॉलरी वार्ड वरोरा ता. वरोरा याचे विरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाक करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S. Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब), ii (ब) N.D.P.S. Act कायदा अन्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपूर,अप्पर पोलीस अधिक्षक मॅडम चंद्रपूर, नयोमी साटम मॅडम सहायक पोलीस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सपोनि. शरद भस्मे, पोउपनि, दिपक ठाकरे, पो. अं. संदीप मुळे, पो. अं. विशाल राजुरकर, पोहवा मोहन निषाद, दिलीप सुर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे, महेश गावतुरे यांनी केली.