पोलीस ठाणे आमगाव अंतर्गत मौजा- पदमपूर शेत शिवारात सावंगी येथील इसमाचा अज्ञात कारणावरून खुन

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव
आमगांव तालुका तील पदमपूर या तील याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, फिर्यादी- श्रीमती महेश्वरी नरेश चौधरी वय 30 वर्ष राहणार सावंगी (चीचटोला) तालुका- सालेकसा, जिल्हा- गोंदिया यांनी तक्रार दिली की, तिचे पती मृतक नामे - नरेश लालचंद चौधरी वय 35 वर्षे राहणार सावंगी यांचा मौजा पदमपूर (आमगाव) शेत शिवारात घटना दिनांक- 12/03/2025 रोजी चे 19.45 ते दिनांक- 13/03/2025 सकाळी अंदाजे 07.30 वाजताचे दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणा वरुन धारदार शस्त्र कोयत्याने गळ्यावर, डोक्यावर मारून जिवानिशी ठार करून खून केल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे आमगाव येथे अपराध क्रमांक- 175/2025 कलम 103,(1), भा.न्या.सं. 2023 अन्वये वेळ 11.42 वाजता गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव प्रमोद मडामे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांना तसेच पोलीस ठाणे आमगाव चे पोलीस निरीक्षक श्री. तिरुपती राणे, यांना निर्देश सूचना देवुन सदर खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या अज्ञात आरोपीचा तत्काळ शोध घेवून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस जेरबंद कऱण्याचे निर्देश दिलेले होते या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, तसेच पोलीस ठाणे आमगाव येथील वेग वेगळी पोलीस पथके आरोपीचे शोधार्थ नेमण्यात आलेली होती.नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाने अतिशय संयमाने, बुध्दीकौशल्य, अथक परिश्रमाने खुनाच्या गुन्ह्याचे अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळा वरून प्राप्त भौतिक व परिस्थितीजण्य पुरावे, गावातील व गाव परिसरातील लोकांना विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रीक विश्लेषण, आणि प्राप्त माहिती वरून अत्यंत कुशलतेने आरोपी ईसंम नामे-श्रवण हरीचंद सोनवाने, वय 25 वर्षे, रा. सावंगी, ता. सालेकसा जि. गोंदिया यास खुनाच्या गुन्ह्यात दुपारी सावंगी येथून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले. आरोपी यास खुनाच्या गंभीर गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी केली असता आरोपीने मृतक चा कोयत्याने खून केल्याचे कबूल केले असुन मृतक याचा खुन करण्याचे मुख्य उद्देश अद्याप कारण स्पष्ट होऊ शकले नाही सदर संबंधात चौकशी सखोल विचारपूस तपास सुरू आहे.आरोपी यास आमगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून खुनाचे कारण गुन्ह्याचे पुढील तपासात निष्पन्न होईल.गुन्ह्यात आरोपी यास अटक पुढील तपास प्रक्रिया आमगाव पोलीस करीत आहेत गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात पो. नि. तिरुपती राणे पो. स्टे.आमगाव हे करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सपोनि धीरज राजूरकर, मपोउपनि वनिता सायकर, पोउपनि. शरद सैदाणे, पोलीस अंमलदार पोहवा राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, तुलसीदास लूटे, सुजित हलमारे, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, हंसराज भांडारकर, संतोष केदार, चापोशी कुंभलवार, राम खंडारे, मुरली पांडे, तसेच पोलीस ठाणे आमगाव- येथील पोलीस निरीक्षक तिरुपती राणे,आणि पोलीस ठाणे आमगाव येथील पोलीस पथक, तसेच तांत्रिक सेलचे- पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, अंमलदार रोशन येरणे, यांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी आरोपीस जेरबंद करण्याकरिता अथक परिश्रम घेवून खूनाच्या गंभीर गुन्ह्याचा तत्परतेने उलगडा केलेला आहे.