बोदलबोडी येथे महिला ग्रामसभेला उस्फूर्त प्रतिसात

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत मौजा बोदलबोडी येथे महिला जागतिक दिनानिमित्त महिला ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले होते. सर्वप्रथम सावित्रीबाई व जिजामाता यांच्या फोटोचे पूजन करून उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या महिला जागतिक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच देवेंद्र पटले प्रमुख अतिथी मध्ये पोलीस पाटील गजानन सोनवणे विशेष पाहुणे म्हणून यशवंतराव शेंडे तसेच महिला प्रतिनिधी लता बहेकार दुर्गा पटले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये महिलांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून व 50% आरक्षण शासनाने दिले आहे,त्याचे सुद्धा महिला वर्गांनी काट्यावर काटेकोरपणे पालन करावे. स्त्रीभ्रूणहत्या थांबवणे,विधवा महिलांना दुसरा विवाह करणे,महिला सशक्तिकरण,बालविवाह थांबवणे,महिला संघटन मजबूत करणे यांच्यासह विविध महिलांना समस्या नेहमी उद्भभवत असतात सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे सुद्धा उकडून दिलेली आहे,यात यांचे फार मोठे योगदान असून प्रत्येक महिलांनी आपापले कर्तव्य समजावून समजून सामाजिक कार्यात हातभार लावावे. संपूर्ण सालेकसा से तालुका सह जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तहसील कार्यालय पंचायत समिती, पोलीस स्टेशन, एकात्मिक बालविकास कार्यालय, ग्रामपंचायत महिला जागतिक दिवस साजरा करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी आर.एम.रामटेके यांनी केले कार्यक्रमाच्या पूर्वतयारी करिता अंगणवाडी सेविका रायवंता शहारे,रोशनी हरीणखेडे,सुनीता नागपूरे,सुनिता मेंढे,ललिता पटले,सुंदरी शेंडे,परमिला मेंढे,गिरजा बहेकार संगणक ऑपरेटर प्रभू नागपुरे,लिलाधर पाथोडे,पुरणलाल बहेकार,प्रदीप पटले यांच्यासह महिला वर्ग पुरुषवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.