मकाटोला कडोतीटोला येथील महिला ग्रामसभा च्या बैठकीला मारली ग्रामसेवकांनी दांडी

Thu 13-Mar-2025,02:21 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा-गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभाग सालेकसा तालुक्यातील मक्काटोला येथील नेहमी चर्चेत असलेली एकमेव ग्रामपंचायत असून गेल्या सप्टेंबर 2023 पासून येथे कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी वेगवेगळ्या विषयाला घेऊन ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामपंचायतला वेळेवर न येणे मुख्यालयही न राहणे महिला जागतिक दिनानिमित्त ग्राम सभांना उपस्थित न राहणे ग्रामस्थांचे फोन न उचलणे असे विविध कारण आजही आहेत त्यामुळे ग्रामपंचायतचे विकास कामे ठप्प पडलेले आहेत. मकाटोला ग्रामपंचायत व कडोतीटोला ग्रामपंचायत हे एक महिला प्रतिनिधी म्हणून या ग्रामपंचायतीला सरपंच प्रतिनिधित्व करत आहेत व महिलांचे विविध प्रश्न महिला ग्रामसभेच्या माध्यमातून शासन प्रशासन नेहमीच लाडकी बहीण म्हणून व 50 टक्के आरक्षण असलेल्या महिला वर्गांचे विविध प्रश्न त्यांच्या मागण्या व त्यांच्यावरील होणारे अत्याचार यासारख्या विविध प्रश्न सुद्धा महिला ग्रामसभा च्या माध्यमातून कसे सोडवता येथील यावर शासन प्रशासन सुद्धा लक्ष नेहमी देत असते,परंतु ग्रामपंचायती ह्या सुद्धा महिला असून याकडे महिला जागतिक दिनालाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी बुट्टी मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कार्यकाळातील अनेक कामे आजही प्रलंबित आहेत ते कार्यालयात त उशिराही नेहमी येत असतात व कार्यालयातून लगेच निघून जातात अशी त्यांची सवय झालेली आहे.यापूर्वी त्यांच्याकडे कोटजंभूरा पोवारीटोला ह्या ग्रामपंचायतीचेही त्यांच्याकडे तिथेही काम केले मात्र त्या टिकू शकल्या नाही विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सुद्धा मक्काटोला येथील ग्रामपंचायत अधिकारी यांची बदली करण्यात यावी असे ठराव घेण्यात आल्याची ही माहिती आहे.सदर ग्रामपंचायत अधिकारी यांना हटवण्यात यावी व त्यांच्या ऐवजी कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह केली जात आहे.

प्रतिक्रिया 

या संदर्भात अधिक माहिती घेतली असता ग्रामसेवक यांना हटवण्याकरिता ग्रामपंचायत कडून पत्रव्यवहार आलेला आहे. याविषयी विस्तार अधिकारी मुनेश्वर चौकशी करीत आहेत जर नक्कीच दोशी आढळले तर ग्रामसेवकावर नियमानुसार कारवाई केली जाईल व सध्या पंचायत समितीचे मासिक सभेत ग्रामसेवक हटावचा ठराव घेतलेला असून पुन्हा एक पत्र ग्रामपंचायत कडून मार्च एंडिंग चे काम पेंडिंग असलेले पूर्ण करे पर्यंत ग्रामपंचायत अधिकारी असतील नंतर त्यांची बदली करण्यात येईल.संजय पुरी गटविकास अधिकारी पंचायत समिती सालेकसा