हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई 13,800 लिटर अवैध कच्चे मोहा रसायन जप्त

अब्दुल कदीर बख्श (हिंगणघाट )
हिंगणघाट : होळीच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट पोलिसांनी अवैध दारू निर्मिती विरोधात मोठी कारवाई करत खैराटी पारधी बेडा येथे 13,800 लिटर कच्चे मोहा रसायन जप्त केले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने 13 मार्च 2025 रोजी धाड टाकली.
सदर ठिकाणी जीना भोसले ही गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलीस येत असल्याचे कळताच ती फरार झाली. घटनास्थळी 5 लोखंडी ड्रम, 7 मोठे प्लास्टिक ड्रम, 8 लहान प्लास्टिक ड्रम आणि 18 जमिनीत गाळून ठेवलेले ड्रम** असे एकूण 13,800 लिटर कच्चे मोहा रसायन आढळून आले, ज्याची अंदाजे किंमत 2,35,000 आहे.
संपूर्ण मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून नष्ट करण्यात आला. जीना भोसले विरोधात हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या अटकेसाठी शोध सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने करण्यात आली.
कारवाईत पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नाईक राहुल साठे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, पोलीस शिपाई आशिष नेवारे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत