गजानन महाराज प्रकट दिना निमित्त मंदिराच्या आवारात 13 फेब्रुवारी पासून 20 फेब्रुवारी पर्यंत भागवत कथेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबटे गडचिरोली
आरमोरी दि.12, श्री संत गजानन महाराज यांच्या 147 व्या प्रकट दिनानिमित्त शिवाजी चौक आरमोरी यांचे सौजन्याने आरमोरी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या आवारात दिनांक 13 फेब्रुवारी पासून 20 फेब्रुवारी पर्यंत भागवत प्रवचन, कीर्तन, भजन अशा विविध भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दिनांक 13 फेब्रुवारीला सकाळी 9-00 वाजता संत नगरी शेगाव येथून आरमोरी नगरीत ज्योतीचे आगमन झाले असून दुपारी 12.00 वाजता संत गजानन महाराज मंदिरात ज्योतीची घटस्थापना करण्यात आली. दिनांक 13 फेब्रुवारी ते 20फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी व रात्रौ 7.00 वाजता हरिपाठ व रात्रौ 8.30 ते 11.00 वाजता पुणे जिल्ह्यातील पंढरपूर वृंदावन आळंदी देवाची येथील ह.भ.प.अनुपमा पिंपळकर यांच्या ओजस्वी वाणीतून श्रीमद् हरिनाम भागवत प्रवचन कार्यक्रम चालणार आहे.तसेच दिनांक 20 फेब्रुवारीला सकाळी 8.00 वाजता संत गजानन महाराजांच्या पालखीची भव्य शोभायात्रा आरमोरी शहरातून निघणार असून दुपारी 2.00 वाजता गोपालकाला व सायंकाळी 5.00 वाजता सहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष मनोज मने, उपाध्यक्ष गणेश फुलबांधे, रवी डोकरे, सचिव भूषण सातव, सहसचिव रुपेश वाकडे, सुभाष गरफडे, कोषाध्यक्ष दिलीप सातव, किरण गोंधोळे व सर्व सदस्य मंडळींनी केली आहे.