अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

Fri 21-Feb-2025,01:12 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा:शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय येथे दि. २५ फेब्रुवारी 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन उच्च शिक्षण संचालनालय पुणे तसेच सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग नागपूर यांच्या आदेशानुसार आणि सांगणेनुसार करण्यात आले आहे. या महाराष्ट्र शासनाच्या पत्रामध्ये हे रक्तदान शिबिर राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित करण्याचे सुचविले गेले आहे. रक्तदान केल्यामुळे आपण कोणाचा तरी जीव वाचू शकतो तसेच शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी देखील हे चांगले असते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन.मूर्ती यांच्या वतीने महाविद्यालयातील सर्व प्रवेशित विद्यार्थी सर्व कर्मचारी व प्राध्यापक वृंद यांना सूचित करण्यात आलेले आहे तरी या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सालेकसा येथील सर्व नागरिकांना देखील महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.