एम.बी.पटेल महाविद्यालयात सावित्रीबाई फुलेना श्रद्धांजली

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रम इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. नामदेव हटवार यांच्या अध्यक्षतेखाली, प्रा. डॉ. भगवान साखरे,शोभा शिवणकर,रूपलता साखरे, डॉ.अश्विन खांडेकर, प्रा. रितू तुरकर, प्रा. मंडले, प्रा.डॉ.वर्षा गंगणे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. हटवार यांनी सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेचा आदर्श घेऊन स्वतःची प्रगती करावी असे विचार व्यक्त केले. इतरही मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमात शालिनी मरसकोल्हे व पायल उईके यांनी सावित्रीबाई फुले यांचे एकपात्री नाटिका सादर केली.कार्यक्रमाचे संचालन डॉ. वर्षा गंगणे यांनी व आभार प्रदर्शन प्रा. भगवान साखरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. राकेश बहेकार, काजल पटले, किरण खोडसिंगे, अर्चना मेश्राम, निकिता लिल्हारे, पिंकी लिल्हारे, कावेरी ठाकरे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.