नरखेड येथे शुल्लक कारणा वरून एका युवकाचा चाकू घुपसून केला खुन

Sat 15-Mar-2025,08:18 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर

जर्मन माधवराव कवडती याने केला हिमांशु विजय वसुले याचा खून 

नरखेड:नरखेड सदर घटना पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत दिनांक १४/०३/२०२५ रोजी १२:०० ते १२:५० वाजताच्या दरम्यान खारीपेठ नरखेड येथे घडली.यातील मृतक हिमांशु विजय वसुले आणि आरोपी जर्मन माधवराव कवडती एकाच गावात राहणारे आहे. दिनांक १४/०३/२०२५ रोजी १०:०० वाजता राममंदीर नरखेड समोर दोन व्यक्तींचा एकमेकांच्या मोटर सायकल ला धडक लागल्यावरून वाद सुरू असतांना यातील मृतक चे वडील नामे विजय वसुले रा.वार्ड क ७ नरखेड यांनी सदर भांडण सोडविण्या करीता मध्यस्थी केली त्यावेळी तेथे हजर असलेल्या नितेश उर्फ जर्मन माधवराव कवडती राहणार वार्ड क्रमांक ३ नरखेड याने मृतक चे वडील विजय वसुले यांना धक्काबुक्की केली.सदर बाब यातील मृतक नामे हिमांशु विजय वसुले वय २२ वर्षे रा.वॉर्ड नं ७ नरखेड याला महीती झाली असता तो आरोपीला जाब विचारायला गेला असता तेथे यातील आरोपी नामे नितेश उर्फ जर्मन माधवराव कवडती राहणार वार्ड क्रमांक ३.नरखेड आणि मृतक हिमांशु विजय वसुले वय २२ वर्षे, राहणार वॉर्ड क्रमांक ७ नरखेड यांचा आपसात वाद झाल्याने आरोपीने मृतक याचा चाकुने वार करून खुन केला.सदर प्रकरणी फिर्यादी शुभम सुभाष गिरडकर वय २६ वर्षे राहणार वार्ड क्रमांक ३ नरखेड तालुका नरखेड जिल्हा नागपूर यांचे तक्रारी वरून पोलिस स्टेशन नरखेड येथे नितेश उर्फ जर्मन माधवराव कवडती राहणार वार्ड क्रमांक ३,नरखेड याच्या विरूद्ध कलम १०३(१) भान्या.सं २०२३ अन्वये गुन्हा नोंद केला असुन नमुद आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.