चेतन ठाकरे यांना उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार जाहीर

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी:श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक असलेले आणि कवी , कलावंत म्हणून नावारूपाला आलेले ग्रामगीताचार्य चेतन ठाकरे (आरमोरी) यांना भारुड या लोककलेसाठी यावर्षीचा उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांना दि. 6 व 7 मार्च 2025 रोजी सांगडी मंडल-बेला जि. आदिलाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात "उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार" देण्यात येणार आहे.सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व मानवस्त्र, रोख रक्कम असे आहे. निवडीबद्दल त्यांचे राजर्षी शाहू महाराज अभिनव कला अकॅडमीचे अध्यक्ष दौलतराव कुथे, उपाध्यक्ष उमेष हर्षे, सचिव विलास गोंदोळे, कोषाध्यक्ष शालीक पत्रे, सहसचिव बळीराम दर्वे, संचालक किशोर हाडगे,संजय बिडवाईकर, रणजित बनकर,शांतीप्रिया येरमे, कामिनी पेंदाम तसेच आरमोरी, गडचिरोली जिल्ह्यातील कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवृंद आदींनी अभिनंदन केले आहे.
Related News
पांचाल लौहार समाज सेवा संस्थान का चतुर्थ सामुहिक विवाह सम्मेलन होगा 10 फरवरी को
05-Feb-2025 | Sajid Pathan
सखीमचं आरमोरी (ग्रामीन )च्या वतीने 76 वा प्रजासत्ताक दिना निमित्य हळदी कूंकू कार्यक्रमं पार पडला
27-Jan-2025 | Sajid Pathan
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या सत्कार प्रसंगी बैलबंडीतून काढण्यात आली मिरवणूक
21-Jan-2025 | Sajid Pathan
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पोर्टिंग क्लब द्वारा दोन दिवशीय कबड्डी सामने
12-Dec-2024 | Arbaz Pathan