पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा येथे आनंद मेळाव्याचे आयोजन

Sun 16-Feb-2025,10:20 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा येथे आनंद मेळावा आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था सचिव डॉ.राजेन्द्रजी बडोले यांचा हस्ते करण्यात आले.तसेच प्रमुख उपस्थिती संस्था अध्यक्षा शालिनी बडोले,डॉ.सरस्वता बिसेन,विभाग प्रमुख एस. आर.बी महिला महाविद्यालय सालेकसा,प्रियंका मिश्रा,लोकेश चन्ने ,पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा हे मान्यवर उपस्थित होते.आनंद मेला मध्ये विद्यार्थांनी पाणी पुरी स्टॉल,इडली सांबर,भेल, पास्ता,चना चटपटी, गुलाब जामून,आलू नड्डा, चीप,कुरकुरा इ. दुकान लावण्यात आले होते. सर्वांनी आनंद मेळाव्या मध्ये विविध पदार्थांचा उपभोग घेऊन मन मुराद आनंद घेतला.कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी किरण क्षीरसागर,दुर्गा बिसेन, काजल राऊत,ज्योती अंबादे,रिंपी शर्मा,प्रणाली भीमटे,मीनाक्षी ठाकूर,पायल भास्कर,पूजा खंडाईत, निर्मला दसरिया,मनिषा सोनवाणे,रोहिणी तिरपुडे, वैकुंटीताई, नंदेश्वर ताई, शहारे ताई,उईके,चन्ने यांनी सहकार्य केले.