कुजलेल्या अवस्थेत मिळाले प्रेत

Mon 17-Feb-2025,10:16 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी शारुखखान पठाण वरोरा

वरोरा :- वरोरा तालुक्यात खांबाडा या गावाजवळील असलेल्या नाल्यावरील पुलाच्या खाली एक प्रेत पोलिसांना आढळून आले. मनोज हरिश्चंद्र पुसनाके रा. मजरा हा दि. 10 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता . त्याची आई गीता हरिचंद्र पुसनाके हिने मुलगा हरविल्याची तक्रार पोलीस स्टेशन वरोरा येथे दिले होती. आज दि. 17 फेब्रुवारी रोजी वरोरा पोलिसांना 112 या क्रमांकाच्या दूरध्वनीद्वारे याची माहिती मिळाली. पोलीस कर्मचारी या पुलाखाली जाऊन मृतकाचा शोध घेऊ लागले असता. नाल्यांच्या झुडपामध्ये हे एक शव अडकून असलेले दिसले, दोन ते तीन दिवसापासून या युवकाचा मृत्यू झाल्याने कुजलेले शरीर माशांनी खाऊन टाकल्यामुळे शरीराची दैनिय अवस्था झाली होती. पोलिसांनी याची माहिती घेतली असता. हे शव राजेंद्र पुसनाके चे असल्याचे त्याची आई गीता हिने कपड्यावरून ओळखले. मृतकाचे उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले .