हिंगणघाट बस स्थानक परिसरातील महिला स्वच्छतालयात कचरापेटीत नवजात अभ्रक सापडल्याने माजली खळबळ

Mon 17-Feb-2025,10:12 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी निखिल ठाकरे हिंगणघाट

हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील बस स्थानक परिसरातील महिला स्वच्छतालयात कचरापेटीत नवजात अभ्रक आढल्याने खळबळ माजली असून पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन पंचनामा करून नवजात अभ्रक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजताचे दरम्यान एका प्रवासी महिलेला शौचालयात असलेल्या कचरापेटीत नवजात अर्भक असल्याचे दिसून आले.सदर बाबीची कल्पना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.यावेळी ठाणेदार मनोज गभणे, पोलिस उपनिरीक्षक दिवाकर रामटेके, पोलिस कर्मचारी सागर सांगोळे, प्रवीण बोधाने इत्यादींनी घटनास्थळी भेट दिली.नवजात अर्भक मुलाचा पंचनामा करीत पोलिसांनी सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.