आरमोरी तालुका सराफा असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरुण रामकृष्ण हर्षे तर सचिवपदी विनोद गंगाधर बेहरे यांची एकमताने निवड

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली: आरमोरी दिनांक 16/2/2025. गडचिरोली जिल्ह्यातील नामांकित अशा आरमोरी तालुका सराफा असोसिएशनची नवीन कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी अरुण रामकृष्ण हर्षे तर सचिव पदी विनोद गंगाधर बेहरे यांची एकमताने निवड करण्यात आली. आरमोरी तालुक्यातील जुनी कार्यकारणी चे अध्यक्ष श्री विजय जी खरवडे उपाध्यक्ष दीपक बेहरे, सचिव विनोद बेहेरे यांनी गेल्या 22 वर्षात सराफा असोसिएशनच्या माध्यमातून सराफा व्यावसायिकाच्या हिताचे तसेच सोनार समाजाच्या हिताचे अनेक कार्य केले आणि त्यांना 22 वर्षे पूर्ण झाले असल्याने नव्या उमेदीला वाव मिळावी या उद्देशाने ही नवीन कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली त्याबद्दल सर्व सदस्यांनी जुन्या कार्यकारणीचे सुद्धा अभिनंदन केले आहे आरमोरी तालुका सराफा असोसिएशनचे सर्व सराफा व्यावसायिकांची नुकतीच दिनांक ६ फेब्रुवारी 2025 रोजी श्री पंकज खरवडे यांच्या दुकानांमध्ये बैठक घेण्यात आली बैठकीचे अध्यक्ष स्थानी सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय रामकृष्ण खरवडे होते सदर बैठकीमध्ये नवीन कार्यकारणी ची एकमताने ठरविण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून हर्षे ज्वेलर्सचे अरुण हर्षे तर सचिव पदी विनोद गंगाधर बेहरे यांची एकमताने निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून बबन बेहरे व जितेंद्र खरवडे तसेच कोषाध्यक्षपदी अतुल डुंबरे सहसचिव म्हणून अरविंद रोकडे मानद अध्यक्ष म्हणून अंकुश विजयराव खरवडे कार्याध्यक्षपदी पंकज खरवडे या सर्वांची निवड सराफा व्यावसायिकांनी एकमताने केली सदर कार्यकारिणीचे मार्गदर्शक म्हणून माजी अध्यक्ष विजय रामकृष्ण खरवडे ,तेजकुमार बेहरे ,सुरेंद्र बेहेरे ,दीपक बेहेरे, सुधीर बेहेरे, यांची निवड करण्यात आली अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांची नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल सराफा व्यवसायिकांमध्ये त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सदर कार्यकारणीच्या बैठकीला संपूर्ण आरमोरी तालुक्यातील सराफा असोसिएशनचे सदस्य व सर्व सोनार व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते