मुलांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत शालेय स्तरावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचा सिंहाचा वाटा असतो' प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अली खान यांचे प्रतिपादन

Mon 17-Feb-2025,01:07 AM IST -07:00
Beach Activities

अरबाज पठाण ( वर्धा )

स्थानिक सनशाईन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे सांस्कृतिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यावर्षी शाळेने शैक्षणिक गुणवत्तेचा आपला २५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून आणि प्रमुख पाहुणे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अली खान उपस्थित होते. त्यांच्यासोबत मुंबईचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता आबिद खान उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सबरंग मल्टीपर्पझ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा तबस्सुम आझमी होत्या. त्यासोबतच व्यासपीठावर सबरंग मल्टीपर्पझ एज्युकेशन सोसायटीचे सचिव आर. आर. आझमी, कोषाध्यक्ष मुजीब शेख, सनशाईन कनिष्ठ महाविद्यालायचे प्राचार्य आणि संचालक आदिल आझमी, सनशाईन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना कोंबे उपस्थित होते. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका रुक्साना खतीब आणि शिक्षक गजानन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सोबतच सनशाईन प्राथमिक (नर्सरी) शाळेच्या नवीन सुसज्जित इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा तबस्सुम आझमी केले. शाळेच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक इतिहासाचा आढावा शाळेच्या पर्यवेक्षिका सुभांगी साखरकर यांनी दृक-श्राव्य (पी. पी. टी.) माध्यमातून उपस्थित पालक-प्रेक्षकांपुढे थोडक्यात विशद केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते अली खान म्हणाले, 'शालेय स्तरावरील स्नेहसंमेलन मुलांना त्यांच्या सुप्त गुणांकडे पाहण्याची दृष्टी निर्माण करते. माझ्या लहानपणी शाळेत प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असल्याने माझ्यात अभिनेता होण्याची इच्छा निर्माण झाली. शालेय जीवनातील संस्कार आणि त्यातून दिली जाणारी मुल्ये ही उद्याच्या सुदृढ नागरीकत्त्वाची प्रक्रिया आहे.'

याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २३-२४ च्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा तबस्सुम आझमी यांच्या हस्ते माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सिद्धी राऊत हिच्या स्वागत-नृत्याने झाली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी पालक-प्रेक्षकांची मने जिंकून घेतांना विविध आशयांवर नृत्य नाटिका सादर केल्यात ज्यांमध्ये 'महाराष्ट्रीयन गोंधळ', 'प्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय रतन टाटाजी यांना श्रद्धांजली', 'शेतकऱ्यांच्या समस्यांवर नृत्य नाटिका', 'प्रादेशिक-लोक नृत्य', 'देशातील सैनिकांचे बलिदान',

'जीवनाचे सार सांगणारे 'जोकर' नृत्य', 'चित्तथरारक पिरॅमिड' इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पालक-प्रेक्षकांना अनुभवता आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन शाळेच्या शिक्षिका शगुफा काझी आणि शिक्षक जीवन अवथरे यांनी संयुक्तरित्या केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

ज्यांमध्येशाळेच्या पर्यवेक्षिका शुभांगी साखरकर, नितेश भोंडे, फरहीन शेख, निकिता सूरकर, पूजा परबत, निकिता राजपूत, योगिता पाटील, प्राची चौधरी, वैशाली काचोळे, दुर्गा वनमाली, नीलिमा तिडके, राखी जीकार, चैताली पानसे, वर्षा ठाकरे, वैशाली फाळके, सुवर्णा भोयर, पूनम उगेमुगे, अंजुम शेख, स्मिता अवथरे, रुखसार शेख, सबा सैय्यद, रोशनी उमक, अश्विनी चौधरी, स्वाती गजभिये, संदीप ठाकूर, सुरज डोंगरे, अवधूत उघडे.