आरमोरी येथे निघाली श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सोनार समाज शाखा आरमोरीच्या वतीने आरमोरी येथील श्रीराम मंदिरापासून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.सर्वप्रथम सोनार समाजाचे अध्यक्ष पंकज खरवडे यांनी संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व विधिवत पूजा अर्चना करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.या मिरवणुकीत हजारो भाविक भक्त सहभागी झाले होते.जय नरहरीच्या गजराने संपूर्ण आरमोरी शहर दुमदुमले.संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडेला भाविकांची मोठी रीघ लागली होती.या मिरवणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांनी पिवळे वस्त्र परिधान करून नरहरी महाराजांच्या भजनावर व गाण्यांवर नृत्य केले.संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या भजनावर तरुणाई थिरकली.स्त्रियांनी पिवळे वस्त्र तर पुरुषांनी पांढरे वस्त्र व भगवी टोपी घालून मिरवणुकीत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या धार्मिक संस्कृतीची ओळख करून घेतली.टाळ -मृदुंग व दिंडीच्या गजरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून निघून या मिरवणुकीचा समारोप साई दामोदर मंगल कार्यालयाच्या सभागृहात संत नरहरी महाराजांच्या आरती व महाभोजनाने करण्यात आला.या मिरवणुकीत सोनार समाजाचे अध्यक्ष पंकज खरवडे सरचिटणीस मदन काळबांधे,दिलीप श्रीरंगे, विनोद बेहरे ओमकार इन्कने,प्रफुल खापरे, विजय खरवडे, जितेंद्र खरवडे,विलास खापरे, उमेश हर्षे,रमेश इनकणे, रुपेश खरवडे,अरविंद रोकडे,किशोर हाडगे, विनायक बेलपांडे,अनंता बेहरे, रुपेश गजपुरे, बबन बेहरे, सुरेंद्र बेहरे, अजय काळबांडे, उमेश गजपुरे, अभिजीत बेहरे, सुधीर गजपुरे, प्रीती गजपुरे, चंदा खापरे, निर्मला काळबांडे, सुनिता काळबांडे, प्रतिभा खरवडे, ज्योती हाडगे, चंदा खरवडे,सविता खापरे, रसिका करंडे, आरजू इन्कने, अनिता बेहरे, कोमल हर्ष, रोशनी काळबांडे, अश्विनी बेहरे, भाग्यश्री खरवडे, सर्वश्या बांगरे, रोहिणी भरणे, प्रतीक्षा हाडगे, गायत्री बेहरे, आरती बेहरे, निवेदिता बेहेरे, ज्योती मस्के, ज्योती हाडगे, अनवी डुंबरे, योगिता रोकडे, स्वाती बेहरे, विशाखा हर्षे, कविता काळबांडे, शारदा हाडगे, विद्या इंकणे, श्रद्धा काळबांडे, वैशाली बिजागरे ,वैशाली हाडगे, अश्विनी गजपुरे, रंजना गजपुरे, राहुल इनकणे, हरिहर काळबांधे, कुणाल भरणे, मंगेश बांगरे, संतोष करंडे, चंदू हर्षे, अभिषेक हर्षे, अक्षय बेहरे, शुभम इंकने, राकेश बेहरे, वंश काळबांडे, किरण बेहरे, मानस काळबांधे,रुपेश गजपुरे,मयूर बेहरे, धनराज काळबांडे,गोकुल खरवडे,गुणवंत बेहरे,सौरभ बेहरे,प्रशांत खापरे,विवेक खापरे यासाहित मोठ्या संख्येने सोनार समाज बांधव उपस्थित होते.