कृषिमंत्री ना.कोकाटे यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची जाहीर मागी मागावी- भूमिपुत्र नितीन सेलकर

सुनिल हिंगे (अल्लिपुर )
राज्याचे कृषिमंत्री यांनी केलेल्या बेताल वक्त्यव्याचा महाराष्ट्रभर निषेध होत आहे,पत्रकारांशी बोलताना राज्याचे कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे यांनी “भिकारी सुध्दा एक रुपया भीक घेत नाही ,परंतु राज्यसरकार एक रुपयात पीक विमा देत आहे” अश्या पद्धतीचे वादग्रस्त विधान त्यानी केले होते,या विधानाचा राज्यभरातील शेतकरी नेते विरोध करताना पाहायला मिळत आहे,थेट जगाच्या पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची तुलनाच भिकाऱ्यांसोबत केल्याने राज्यभर रोष पाहायला मिळत आहे,शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना योग्य भाव जर सरकारने दिला किवा आयात निर्यात धोरना मध्ये जर बद्दल केला तर शेतकऱ्यांना सरकारच्या अश्या फसव्या योजनांची गरज भासणार नाही,शेतकरी स्वकष्टाने कमवून सरकारला कर्ज देवू शकतो,इतकी ताकत शेतकऱ्याच्या मनगटात आहे,त्यामुळेच शेतकरी एका दाण्याचे हजारो दाणे करतो,शेतकऱ्यांना दिल किती यापेक्षा शेतकऱ्याना लुटल किती याचा हिशोब सरकारने आधी द्यावा,आणि जे दिल ते कुठल्या मंत्र्यांनी घरून दिलेलं नसून सरकारच्या तिजोरीतून दिलेलं असल्याचे शिवराया संघटनेचे अध्यक्ष नितीन सेलकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे,सोबतच त्यांनी मागील पावसाळ्यात झालेल्या सोयाबीन व कपाशी पिकांच्या नुकसानीचा पीक विमा अजून पर्यंत जमा झालेला नाही,बऱ्याच शेतकऱ्यांची नुकसान झाली पीक विमा कंपनीला तक्रार करायला कॉल लागले नाही,कधी कॉल लागले तर अधिकारीच बांधावर आले नाही,पीक विमा अधिकारी यांनी बरेचदा शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे त्यानी बोलताना सांगितले,या गंभीर बाबींचा निषेध यावेळी नितीन सेलकर यांनी केला.